Breaking News

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ६७ पत्रकारांच्या कुटुंबास मिळणार ५ लाख रुपये आर्थिक मदत..!

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ६७ पत्रकारांच्या कुटुंबास मिळणार ५ लाख रुपये आर्थिक मदत..!

नवी दिल्ली : देशात कोरोना महमारीमुळे आतापर्यंत लाखो जणांना जीव गमावावा लागला आहे. यामुळे कित्येक कुटुंबांनी आधार गमवाला आहे. यामध्ये सामान्य नागरिकच नाही तर अगदी व्हीआयपी व्यक्तींपासून ते करोना योद्धे, शासकीय कर्मचारी, सेलिब्रिटी व पत्रकारांचा देखील समावेश आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्र सरकारकडून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ६७ पत्रकारांच्या कुटुंबासाठी ५ लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार भारत सरकारने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या ६७ कुटुंबाना आर्थिक मदतीसाठी मंजुरी दिली आहे. गुरूवारी माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या पत्रकार कल्याण योजनेअंतर्गत प्रत्येक परिवारास ५ लाख रुपये देण्याचे जाहीर केले आहे.

अनेक दिवसांपासून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबासाठी आर्थिक मदत दिली जावी,अशी मागणी केली जात होती. झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुवर दास यांनी देखील अशा कुटुंबासाठी सहायता निधीची मागणी केलेली आहे.केंद्र सरकारने देखील हा मुद्दा गांभीर्याने घेत गुरूवारी एका बैठकीत आर्थिक मदतीसाठी मंजुरी दिली. केंद्र सरकार ६७ पत्रकारांच्या प्रत्येक कुटुंबास ५ लाख रुपये आर्थिक मदत देणार आहे.

About Shivshakti Times

Check Also

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत निवेदन- राहुल भाईजी पवार

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन- राहुल भाईजी पवार शिवशक्ती …

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार शिवशक्ती टाइम्स न्युज – (प्रतिनिधी युसूफ पठाण) यापुढे वाहतूक …

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन शिवशक्ती …

Leave a Reply

Your email address will not be published.