Breaking News

प्रत्येक रेशन दुकानदाराने ग्राहकांना पावती देणे बंधनकारक उपविभागीय अधिकारी डॉ. शर्मा

मालेगाव –  उपसंपादक – आनंद दाभाडे

शिधापत्रिकाधारकांना ( रेशन कार्ड) अन्नधान्य पुरवठा विभागातर्फे सवलतीच्या दरात धान्यवाटप केले जाते. यात घोळ होऊ नये, यासाठी शिधापत्रिकाधारकांच्या बोटांच्या ठशांची नोंद घेण्यात आली आहे. त्यासाठी
Published from Blogger Prime Android App
प्रत्येक दुकानांमध्ये पीओएस मशिन लावण्यात आले आहेत. राज्य शासनाच्या अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रक्रिया राबविण्यात येत आहे. वितरण प्रणालीचा धान्य वाटपात पारदर्शकता आणण्यासाठी रेशन दुकानात ‘पीओएस मशिन लावण्यात आल्या असून याद्वारे धान्य वितरण करणे सुरू आहे. मात्र काही रेशन दुकानदार संबंधित ग्राहकांना कमी धान्य वाटप करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक रेशन दुकानदाराने ग्राहकांना वितरीत केलेल्या धान्याची पावती देणे बंधनकारक असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी डॉ. विजयानंद शर्मा यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
रेशन दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला त्याला अनुज्ञेय असलेले धान्य किती प्रमाणात मिळते हे जाणून घेणे त्याचा हक्क आणि अधिकार आहे. ग्राहकांनी देखील त्यांना मिळत असलेल्या धान्याची खातरजमा करण्यासाठी प्रत्येक रेशन दुकानातून धान्य प्राप्त करुन घेतल्यानंतर पावतीची मागणी करावी. तसेच जे रेशन दुकानदार धान्यवाटप केल्यानंतर पावती देण्यास टाळाटाळ करतील त्यांची रितसर तक्रार पुरवठा विभागात संबंधित ग्राहकाने करावी असे आवाहनही उपविभागीय अधिकारी डॉ. शर्मा यांनी केले आहे.

About Shivshakti Times

Check Also

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत निवेदन- राहुल भाईजी पवार

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन- राहुल भाईजी पवार शिवशक्ती …

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार शिवशक्ती टाइम्स न्युज – (प्रतिनिधी युसूफ पठाण) यापुढे वाहतूक …

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन शिवशक्ती …

Leave a Reply

Your email address will not be published.