Breaking News

मालेगाव वनक्षेत्रात होणार 1 लाख 64 हजार वृक्षलागवड:वनपरिक्षेत्र अधिकारी विलास कांबळे

शिवशक्ती टाइम्स न्यूज

मालेगाव दिनांक 30: वनपरिक्षेत्रातंर्गत यंदाच्या पावसाळ्यात सुमारे 1 लाख 64 हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून त्याअनुषंगाने वृक्षलागवडीच्या नियोजनास सुरुवात करण्यात आली आहे. वृक्षलागवडीसोबतच वनपरिक्षेत्रात वन्यजीवांसाठी जवळपास ८८ वनतळे तयार करण्यात आली आहेत. यंदाच्या पावसाळ्यात नैसर्गिकरित्या वनतळे पावसाच्या पाण्याने भरून वन्यप्राण्यांची वर्षभर पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे. यामुळे वन्यप्राण्यांची मानवी वस्तीत भटकंती रोखण्यासाठी हा उपक्रम निश्चितच फायदेशीर ठरणार असल्याचे मालेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी विलास कांबळे यांनी सांगितले आहे.

वनपरिक्षेत्रात वनतळे तयार करणे व वृक्ष लागवड करण्याबाबत मालेगाव उपविभागीय वनपरिक्षेत्र अधिकारी जगदीश येडलावार यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव वनपरिक्षेत्रात 1 जुलै पासून 1 लाख 64 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. मालेगाव तालुक्यातील जळकू, टोकडे, जळगाव, झाडी, चिंचगव्हान, डोंगराळे या सहा गावांच्या वनपरिक्षेत्राच्या वनहद्दीत वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. वृक्ष लागवडीसाठी मालेगाव सह चिंचवे व वनपट या ठिकाणच्या रोप वाटिकेत जवळपास 3 लाख रोपे तयार करण्यात आली आहेत. यामध्ये चिंच, सीताफळ, आवळा, करंज, अंजन, शिसव आदी वृक्षांची रोपे तयार करण्यात आली आहेत. अशी माहिती विलास कांबळे यांनी दिली.

मागील वर्षी कोरोनाच्या महामारीमुळे शासनाच्या प्रतिबंधात्मक आदेशानुसार वृक्ष लागवड करण्यात आली नव्हती. परंतू यंदाच्या पावसाळी हंगामात शासनाच्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांचे पालन करून सामाजिक संस्था कार्यकर्ते, वन्यप्रेमी, स्थानिक लोकसहभागातून वनपरिक्षेत्रात वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट् पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास उपविभागीय वनपरिक्षेत्र अधिकारी जगदीश येडलावार यांनी व्यक्त करत वृक्षलागवडीची मोहिम यशस्वी करण्यासाठी सर्व नागरिकांनी देखील या मोहिमेत मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

About Shivshakti Times

Check Also

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत निवेदन- राहुल भाईजी पवार

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन- राहुल भाईजी पवार शिवशक्ती …

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार शिवशक्ती टाइम्स न्युज – (प्रतिनिधी युसूफ पठाण) यापुढे वाहतूक …

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन शिवशक्ती …

Leave a Reply

Your email address will not be published.