Breaking News

पञकार मारहान , हल्ला संदर्भात अखेर पञकार संरक्षण कद्याअंतर्गत गुन्हा दाखल……!

शिवशक्ती टाइम्स न्यूज

पत्रकार- युसूफ पठाण

 

पोलीस स्टेशन MIDC सिडको, औरंगाबाद शहर.
गु.र.नं. 233/2021 कलम- 143, 147, 149, 447, 323, 504 भादवि सहकलम पत्रकार संरक्षण अधिनियम- 2017 कलम- 4
फिर्यादी- रविंद्र विठ्ठलराव तहकीक वय51वर्षे धंदा- दैनिक लोकपत्राचे कार्यकारी संपादक रा जयभवाणी नगर गल्ली नं. 1औरंगाबाद मो न 7888030472
आरोपी- (1)गणेश उगले, (2) निलेश भोसले, (3)बाबुराव वाळेकर, (4)उमेश शिंदे व (5) अनोळखी एक नाव/पत्ता माहीत नाही.
गु.घ.ता वेळ व ठिकाण- दि.30/05/2021 रोजी 13.30 वा.सु. दैनिक लोकपत्रचे ऑफिस MIDC चिकलठाणा धुत हॉस्पीटल जवळ औरंगाबाद.
खुलासा- नमुद ता वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी हे दैनिक लोकपत्र येथे अधिकृत कार्यकारी संपादक असुन, फिर्यादी हे देनिक लोकपत्रचे ऑफिस MIDC चिकलठाणा धुत हॉस्पीटल जवळ औरंगाबाद येथे असतांना यातील नमुद आरोपीतांनी गैरकाद्याची मंडळी जमवुन फिर्यादिच्या दैनिक लोकपत्र च्या ऑफिसमध्ये फिर्यादिची परवानगी न घेता ऑफिसमध्ये घुसुन फिर्यादिस, तुम्ही तुमच्या दैनिक लोकपत्रमध्ये आमच्या राणे साहेबांच्या विरुध्द मुख्य पानावर बातमी का छापली? असे म्हणुन आरोपीतांनी फिर्यादिस शिवीगाळ केली व धक्काबुक्की धक्का बुक्की करुन तुम्ही वेश्या आहात असे म्हणुन फिर्यादिच्या अंगावर काळ्या रंगाचा पदार्थ फेकला. अशी फिर्यादीने फिर्याद दिल्यावरुन वरील नमुद कलमा प्रमाणे डिओ अधिकारी पोउपनि/ नागरे यांनी गुन्हा दाखल करुन मा.पोनिसो यांच्या आदेशाने पुढील तपास कामी स.पो.आ. सिडको विभाग भुजबऴ यांच्याकडे दिला आहे.

About Shivshakti Times

Check Also

अजंग-रावळगाव येथील औद्योगिक भूखंडासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास 18 जून पर्यंत मुदत वाढ

अजंग-रावळगाव येथील औद्योगिक भूखंडासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास 18 जून पर्यंत मुदत वाढ शिवशक्ती टाइम्स न्यूज …

तुम्हाला KYC साठी कॉल किंवा मेसेज आल्यास सावधान

तुम्हाला KYC साठी कॉल किंवा मेसेज आल्यास सावधान-गृह मंत्रालयाचा अलर्ट! आपली बँक रिकामी होऊ शकते …

सिक्स सिग्मा व सनराईज रुग्णालय बनावट कागदपत्रांच्या आधारे सुरू केल्याप्रकरणी संचालकावर गुन्हा दाखल

मनपा आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे यांचा पदभार काढला मालेगाव : प्रतिनिधी कोरोना रूग्णांकडून अव्वाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *