Breaking News

मालेगाव महापालिकेची धडक दंडात्मक कारवाई

पारस सुपर मार्केट व वैष्णवी बुटीक वर कारवाई

शिवशक्ती टाइम्स न्यूज

मुख्य संपादक – जयेश सोनार (दाभाडे)
उपसंपादक – आनंद दाभाडे

मालेगाव महानगरपालिकेचे मा.आयुक्त भालचंद्र गोसावी यांच्या निर्देशानुसार
कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने उपायुक्त रोहिदास दोरकुळकर यांच्या सुचनेने सहा.आयुक्त (कर) तुषार आहेर यांच्या अधिपत्याखाली मालेगाव महानगर पालिकेच्या वतीने 1 दुकान बंद करण्यात आले तर दुसऱ्या दुकानावर रू. 7000/- वसूल करून दंडात्मक कारवाई करण्यात आली. यावेळी प्रभाग अधिकारी हरीश डिंबर आणि पथक प्रमुख पुंडलिक ढोणे यांसह इतर कर्मचारी उपस्थित होते.
कोरोनाचा संसर्ग पाहता ‘ब्रेक द चेन’ अन्तर्गत मधील निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी होईल असे शासनाचे निर्देश असताना नियम व निर्देश डावलून काही लोक उल्लंघन करीत आहेत, त्यावर कारवाई करण्याचे आयुक्तांचे निर्देशांप्रमाणे दिनांक 1 जुन 2021 रोजी मालेगाव महानगरपालिका प्रभाग कार्यालय क्रमांक 1 च्या क्षेत्रात सहाय्यक आयुक्त कर श्री. तुषार आहेर साहेब, प्रभाग अधिकारी हरीश डिंबर, यांचे पाहणी दरम्यान पारस सुपर मार्केट हे दुकान निर्धारित वेळेपेक्षा अधिक वेळ सुरू असल्याचे आढळून आल्याने सहाय्यक आयुक्त यांचे निर्देशानुसार त्यांच्यावर रुपये रू.5000/- दंड तसेच तिथे प्रत्यक्ष 2 ग्राहक आढळल्याने प्रति ग्राहक हजार रुपये याप्रमाणे दोन हजार असे एकूण रु.7000/- दंड वसूल करण्यात आला. आणि नियमांचे पालन करणे बाबत सूचना दिल्यात. तसेच लोढा मार्केट मधील रात्री 7 वाजेपर्यंत चालू असलेली वैष्णवी बुटीक हे दुकान बंद करणे ची कारवाई करण्यात आली. यावेळी सर्वांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन आयुक्त श्री गोसावी यांनी केले आहे.
(दत्तात्रय काथेपुरी)
जनसंपर्क अधिकारी,मनपा मालेगाव.

About Shivshakti Times

Check Also

‼️ वाहतूक पोलिसांची कोर्टाने केली कानउघाडणी‼️

‼️ वाहतूक पोलिसांची कोर्टाने केली कानउघाडणी‼️ चलन अथवा दंडाची रक्कम जागीच भरण्याबाबत जबरदस्ती करू नये,” …

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ओझर विमानतळावर स्वागत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ओझर विमानतळावर स्वागत शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी -युसूफ पठाण मुख्यमंत्री उद्धव …

मालेगावात अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणारे गुन्हेगार जेरबंद

मालेगावात अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणारे गुन्हेगार जेरबंद तीन देशी बनावटीचे पिस्टल व सात जिवंत काडतुसे हस्तगत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *