Breaking News

इंडियन बुटीक दुकानावर मालेगाव महापालिकेची 20,000/- दंडात्मक कारवाई: आयुक्त भालचंद्र गोसावी.

इंडियन बुटीक दुकानावर मालेगाव महापालिकेची 20,000/- दंडात्मक कारवाई: आयुक्त भालचंद्र गोसावी.

मालेगाव महानगरपालिकेचे मा.आयुक्त भालचंद्र गोसावी यांच्या निर्देशानुसार कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने उपायुक्त रोहिदास दोरकुळकर यांच्या सुचनेने सहा.आयुक्त (कर) तुषार आहेर यांच्या अधिपत्याखाली मालेगाव महानगर पालिकेच्या वतीने मोसम पुल येथील इंडियन बुटीक या कपड्याच्या दुकानावर एकूण रु.20000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यावेळी प्रभाग अधिकारी हरीश डिंबर आणि पथक प्रमुख पुंडलिक ढोणे यांसह पोलीस व इतर कर्मचारी उपस्थित होते.

कोरोनाचा संसर्ग निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी होईल असे शासनाचे निर्देश असताना नियम व निर्देश डावलून काही लोक उल्लंघन करीत आहेत, त्यावर कारवाई करण्याचे आयुक्तांचे निर्देशांप्रमाणे मालेगाव महानगरपालिका प्रभाग कार्यालय क्रमांक 1 च्या कार्यक्षेत्रात सहाय्यक आयुक्त कर श्री.तुषार आहेर साहेब, प्रभाग अधिकारी हरीश डिंबर, यांचे पाहणी दरम्यान बुधवार दिनांक 2 जुन 2021 रोजी सायंकाळी मोसम पुल येथील इंडियन बुटीक दुकानावर निर्धारित वेळेपेक्षा अधिक वेळ दुकान सुरू असल्याने दंडात्मक कारवाई म्हणून दुकानास 5000/- व तिथे प्रत्यक्ष 15 ग्राहक आढळल्याने 15 ग्राहकांच्या उपस्थिती बद्दल प्रती ग्राहक प्रत्येकी 1000/- रुपये प्रमाणे रु.15000/-असे एकूण रु.20000/-रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यावेळी सर्वांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन आयुक्त श्री गोसावी यांनी केले आहे.
(दत्तात्रय काथेपुरी)
जनसंपर्क अधिकारी,मनपा मालेगाव.

 

About Shivshakti Times

Check Also

‼️ वाहतूक पोलिसांची कोर्टाने केली कानउघाडणी‼️

‼️ वाहतूक पोलिसांची कोर्टाने केली कानउघाडणी‼️ चलन अथवा दंडाची रक्कम जागीच भरण्याबाबत जबरदस्ती करू नये,” …

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ओझर विमानतळावर स्वागत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ओझर विमानतळावर स्वागत शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी -युसूफ पठाण मुख्यमंत्री उद्धव …

मालेगावात अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणारे गुन्हेगार जेरबंद

मालेगावात अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणारे गुन्हेगार जेरबंद तीन देशी बनावटीचे पिस्टल व सात जिवंत काडतुसे हस्तगत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *