Breaking News

7 जूनपासून महाराष्ट्र पाच टप्प्यात अनलॉक होणार

7 जूनपासून महाराष्ट्र पाच टप्प्यात अनलॉक होणार,

कोणतं शहर कोणत्या टप्प्यात?

नाशिक जिल्हा तिसऱ्या टप्प्यात ! वाचा काय सुरु काय बंद

शिवशक्ती टाइम्स न्यूज
प्रतिनिधी – युसूफ पठाण

मुंबई :-:- राज्यातील अनलॉकबाबत गोंधळाचं वातावरण निर्माण झालं असताना मुख्यमंत्री कार्यलयाने शनिवारी (5 शनिवार) पहाटे महाराष्ट्र अनलॉक कसा करणार याची सविस्तर अधिसूना जारी केली आहे. आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यानुसार पाच टप्प्यात निर्बंध शिथिल केले जातील.

👉ही अधिसूचना सोमवारपासून 7 जून रोजी लागू होईल.आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे त्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या प्रशासकीय पातळीवरील या निर्बंधांची अंमलबजावणी केली जाईल.

– अनलॉक करत असताना 5 स्तर तयार करण्यात आले आहेत. या अधिसूचनेनुसार पहिल्या टप्प्यात येणारे जिल्हे आणि शहरांमध्ये कमीतकमी निर्बंधित असतील, तर तर पाचव्या टप्प्यातील निर्बंध अधिक कडक असतील. आर्थिक राजधानी मुंबईचा समावेश तिसऱ्या टप्प्यात आहे.

– पहिल्या टप्प्यात मॉल, थिएटर आणि सर्व दुकानं सुरळीत राहतील. तर दुसऱ्या टप्प्यात येणाऱ्या शहर आणि जिल्ह्यांमध्ये मॉल आणि थिएटर्स 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. तर तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील शहर आणि जिल्ह्यांमध्ये निर्बंधासह सेवा राहिल.

👉कोणत्या स्तरात कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे? काय बंद आणि काय सुरु राहणार?

👉टप्पा – 1

– सर्व प्रकारची दुकानं पूर्ववत सुरु होणार, मॉल, दुकानं, मल्टिप्लेक्स, नाट्यगृह नियमितपणे सुरु होणार

– लोकल सेवा पूर्ववत होईल, मात्र स्थितीनुसार स्थानिक आपत्ती व्यवस्थापन विभागाला निर्बंध घालण्याची मुभा असेल

– जिम, सलू, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्सना परवानगी, सार्वजनिक ठिकाणे, मैदाने खुली होतील

– सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्ववत होईल, इथे जमावबंदी नसेल

– खासजी कार्यालये सुरु होती, तर शासकीय कार्यलये 100 टक्के क्षमतेने सुरु होतील

– विविध खेळ, चित्रीकरण, सामाजिक, सांस्कृतिक मनोरंजनात्मक कार्यक्रमांनाही मुभा असेल

– लग्नसोहळा, अंत्यविधी, बैठका, निवडणूक यावर कोणतीही बंधनं नसतील, या भागात जमावबंदी नसेल.

👉टप्पा – 2

– 50 टक्के क्षमतेने रेस्टॉरंट सुरू राहतील

– मॉल्स आणि सिनेमगृह 50 टक्के सुरू राहतील

– सार्वजनिक जागा , मैदाने, वॉकिंग ट्रॅक पूर्ण सुरू राहतील

– बांधकाम क्षेत्रातील पूर्ण कामे सुरू राहतील

– कृषी क्षेत्रातील कामे पूर्ण सुरू राहतील

– ई सेवा पूर्ण सुरू राहील

– जिम, सलून, स्पा,वेलनेस सेंटर 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील

– बसेस बैठक क्षमता पूर्ण क्षमतेने सुरू राहतील

– जिल्हयाच्या बाहेर खाजगी वाहन , बसेस, इतर राज्यात जाणारी लोकल सेवा, टॅक्सी यांना परवानगी आहे. मात्र पाचव्या स्तरातील जिल्ह्यात जाण्यासाठी ई पासची आवश्यकता असेल.

👉टप्पा – 3

– अत्यावश्यक सेवेतील दुकाने 7 ते 2 वाजेपर्यंत आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार 7 ते 2 वाजेपर्यंत सुरू राहतील अत्यावश्यक सेवा वगळता शनिवार आणि रविवार बंद राहतील

– मॉल्स आणि सिनेमागृह पूर्णपणे बंद राहतील

– हॉटेल्स 50 टक्के क्षमतेने सकाळी 7 ते 2 वाजेपर्यंत खुली रहातील. दुपारी 2 नंतर पार्सल सेवा सुरू राहिल. शनिवार आणि रविवार बंद राहतील.

– सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक सकाळी 5 ते 9 यावेळेत सुरू रहातील

– खाजगी आणि सरकारी कार्यालयात 50 टक्के क्षमतेने उपस्थिती राहील

– इंडोर खेळले जाणारे स्पोर्ट्स बंद राहतील

– सिनेमा चित्रीकरणाला स्टुडीओ मध्ये परवानगी असेल

– सामाजित, सांस्कृती, मनोरंजनात्म कार्यक्रमाला 50 टक्के क्षमतेने दुपारी 2 वाजेपर्यंत परवानगी राहील (सोमवार ते शुक्रवार)

-लग्न सोहळे 50 जणांची उपस्थिती, अंत्यसंस्कार 20 जणांची उपस्थिती, इतर बैठका 50 टक्के उपस्थित राहील

– कृषी क्षेत्रातील कामांना आणि ई कॉमर्स, बांधकाम क्षेत्रातील कामांना दुपारी 2 वाजेपर्यंत परवानगी राहील

– दुपारी 2 वाजल्यानंतर जमावबंदी कायम राहिल

👉टप्पा – 4

– अत्यावश्यक सेवेतील दुकाने 7 ते 2 वाजेपर्यंत (सोमवार ते शुक्रवार) उघडी राहतील

– अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानं पुर्ण वेळ बंद रहातील

– सिनेमागृह, मॉल पूर्णपणे बंद राहतील

– हॉटेलमधील फक्त पार्सल सेवा सुरू राहील

– सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक सकाळी 5 ते 9 सुरू रहातील (सोमवार ते शुक्रवार)

– अत्यावश्यक सेवेतील खाजगी कार्यालयात फक्त 25 टक्के उपस्थिती राहील

– शासकीय कार्यालयात 25 टक्के उपस्थिती

– स्पोर्टसमध्ये आईटडोर सकाळी 5 ते 9 (सोमवार ते शुक्रवार) सुरु राहतील

– कोणत्याही सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमालाल परवानगी नाही

– लग्न सोहळ्यासाठी 25 लोकांची उपस्थिती, अंत्यसंस्कारसाठी फक्त 20 लोकांची उपस्थिती बंधनकारक

– राजकीय किंवा इतर बैठका 50 टक्के क्षमता राहील

– ज्या ठिकाणी कामगारांच्या रहाण्याची सोय आहे अश्याच ठिकानाची बांधकामं सुरू रहातील

– कृषी कामे दुपारी 2 वाजेपर्यंत (सोमवार ते शुक्रवार) सुरू राहतील.

– ई कॉर्मस फक्त अत्यावश्यक सेवेसाठी सुरू राहील

– सलून आणि जीम 50 टक्के क्षमता सुरू राहील पण एसीचा वापर करता येणार नाही

– बसेस 50 टक्के क्षमतेने सुरु राहील. उभे प्रवासी नाही

– संचारबंदीचे नियम लागू राहतील

👉टप्पा – 5

सध्या पाचव्या टप्प्यात एकही जिल्हा नाही. जर पुढील आठवड्यात जास्त रुग्णसंख्य वाढली तर पाचव्या टप्प्यामध्ये समावेश होईल.

👉कोणतं शहर कोणत्या टप्प्यात?

जिल्हा

भरलेले ऑक्सिजन बेड (%) / पॉझिटिव्हिटी दर (%)

👉पहिला टप्पा

अहमदनगर २४.४८ / ४.३०
चंद्रपूर ९.३०/३.०९
धुळे ४.२५  / २.५४
गोंदिया ६.३२  / २.३७
जळगाव १५.१७ / १.६७
जालना १७.६५ / २.०५
लातूर १५.१३ / ४.२४
नागपूर ८.१३ / ३.८६
नांदेड ४.२८ / १.९३
यवतमाळ १३.५८ / ४.१९

👉दुसरा टप्पा

हिंगोली २९.३४ / ४.३७
नंदुरबार २९.४३ / ३.३१

👉तिसरा टप्पा

मुंबई उपनगर १२.५१ / ५.२५
ठाणे १९.२५ / ७.५४
नाशिक १८.७१ / ७.७५
औरंगाबाद २०.३४  / ५.३८
अकोला ४३.०४ / ७.७४
अमरावती २८.५९  / ६.५६
बीड ४७.१४ / ८.४०
भंडारा ४.४१ / ७.६७
गडचिरोली ५.९२ / ६.५१
उस्मानाबाद ३१.०९ / ७.७०
पालघर ४८.९३ /५.११
परभणी १६.०२ /७.१०
सोलापूर ४४.३९ /६.७८
वर्धा ४.०४ /७.५७
वाशिम १८.९० / ५.१९

👉टप्पा चौथा

पुणे २०.४५ / १३.६२
बुलडाणा ७.७१ / १०.०३
कोल्हापूर ७१.५० / १५.२५
रायगड ३८.३० / १९.३२
रत्नागिरी ५१.८१ /१६.४५
सांगली ४७.९४ / १४.०१
सातारा ६१.५५ / १५.६२
सिंधुदुर्ग ६६.५६ / १२.७०

About Shivshakti Times

Check Also

‼️ वाहतूक पोलिसांची कोर्टाने केली कानउघाडणी‼️

‼️ वाहतूक पोलिसांची कोर्टाने केली कानउघाडणी‼️ चलन अथवा दंडाची रक्कम जागीच भरण्याबाबत जबरदस्ती करू नये,” …

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ओझर विमानतळावर स्वागत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ओझर विमानतळावर स्वागत शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी -युसूफ पठाण मुख्यमंत्री उद्धव …

मालेगावात अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणारे गुन्हेगार जेरबंद

मालेगावात अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणारे गुन्हेगार जेरबंद तीन देशी बनावटीचे पिस्टल व सात जिवंत काडतुसे हस्तगत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *