Breaking News

सिक्स सिग्मा व सनराईज रुग्णालय बनावट कागदपत्रांच्या आधारे सुरू केल्याप्रकरणी संचालकावर गुन्हा दाखल

मनपा आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे यांचा पदभार काढला

मालेगाव : प्रतिनिधी
कोरोना रूग्णांकडून अव्वाच्या सव्वा बील आकारूण लुट करणाऱ्या येथील सिक्स सिग्मा व सनराईज या दोन्ही रुग्णालया विरुध्द आता बनावट कागदपत्रांच्या आधारे रुग्णालय सुरू केल्याची तक्रार महापालिकेचे उपायुक्त राजू खैरनार यांनी छावणी पोलिस ठाण्यात दिली असून याप्रकरणी रुग्णालयाचे संचालक रमणलाल कन्हैय्यालाल सुराणा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील सनराईज व सिक्ससिग्मा या दोन्ही रुग्णालयाचे संचालक सुराणा यांनी रुग्णालयाच्या नोंदणी संदर्भात दाखला मिळण्यासाठी दि. २७ नोव्हेंबर २०२० रोजी मनपा आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे यांच्याकडे अर्ज दाखल केला होता. या अर्जासोबत त्यांनी अग्निशमन विभागाचा ना हरकत दाखला दिला होता. त्या दाखल्यामध्ये सनराईज व सिक्स सिग्मा रूग्णालय असे नमुद केलेले असून तो दाखला प्रमुख अग्निशमन अधिकारी संजय पवार यांनी दि. ८ फेब्रुवारी २०२० रोजी दिल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र मुख्य अग्निशमन अधिकारी पवार यांनी सदर रुग्णालयास ना हरकत दाखला दिला नसल्याचा व सदर ना हरकत दाखल्यावर बनावट पद्धतीने नाव टाकले असल्याबाबत खुलासा केला आहे.
या दोन्ही रुग्णालयाच्या इमारत मालमत्ता कराच्या आकारणी संदर्भात दि. ७ जानेवारी २०२० रोजी मिळकत मालकाशी केलेल्या भाडे करारनामाची छायांकित प्रत प्रभाग १ मध्ये १९ मार्च २०२१ रोजी सुराणा यांनी सादर केली होती. यात लायसन फि ३० हजार व मेन्टनन्स फि ही ४० हजार रुपये असे एकुण ७० हजार रुपये दर्शविण्यात आली होती. सदर करार हा ११ महिन्यासाठी १ जानेवारी २०२० पासुन अस्तित्वात आल्याचे दर्शविलेले होते. मात्र सिक्स सिग्मा रुग्णालयाकडून आरोग्य विभागाकडे दाखला मिळण्यासाठी दाखल केलेल्या कागदपत्रांसोबत नोंदणीकृत भाडे करारनाम्याची छायांकित प्रत जोडली असून त्यामध्ये लायसन फि १ लाख ११ हजार रुपये दर्शविण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सदर रूग्णा संचालक सुराणा यांच्या कडून महापालिकेचा कर बुडविण्यासाठी चुकीची व दिशाभुल करणारी माहीती पुरवुन महापालिकेचे वार्षिक २ लाख ३० हजार २५६ रुपये इतके आर्थिक नुकसान करून फसवणुक केली म्हणून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनपा आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे यांचा पदभार काढला

गेल्या काही दिवसांपासून शहरातील खासगी रुग्णालये कोरोना रुग्णांकडून अवाजवी
बिले आकारत असल्याचे प्रकरण गाजत असतानाच येथील महापालिकेच्या 
आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे यांचा पदभार काढून घेण्यात आल्याची 
माहिती आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी दिली. डॉ. ठाकरे यांचा पदभार काढण्यात 
आल्याने मनपा वर्तुळात खळबळ उडाली आहे. कोरोना रुग्णांची लुट करणाऱ्या शहरातील
सिक्स सिग्मा रूग्णालया विरोधात कारवाई करण्यासाठी कृषीमंत्री दादा भुसे यांनी शिवसेना 
पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत प्रशासनाला चार दिवसाचा अल्टीमेटम दिला आहे. 
याच बैठकीत शिवसेना नेते तथा कृऊबा उपसभापती सुनील देवरे यांनी 
मनपा आरोग्याधिकारी डॉ. ठाकरे यांच्या निलंबनाची मागणी केली होती. 
त्याच्या दुसऱ्याच दिवशी आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी डॉ. ठाकरे यांचा 
पदभार काढून घेत डॉ. हेमंत गढरी यांची मनपा आरोग्याधिकारीपदी 
तात्पुरती नियुक्ती केली आहे.

About Shivshakti Times

Check Also

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत निवेदन- राहुल भाईजी पवार

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन- राहुल भाईजी पवार शिवशक्ती …

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार शिवशक्ती टाइम्स न्युज – (प्रतिनिधी युसूफ पठाण) यापुढे वाहतूक …

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन शिवशक्ती …

Leave a Reply

Your email address will not be published.