Breaking News

अजंग-रावळगाव येथील औद्योगिक भूखंडासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास 18 जून पर्यंत मुदत वाढ

अजंग-रावळगाव येथील औद्योगिक भूखंडासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास 18 जून पर्यंत मुदत वाढ

शिवशक्ती टाइम्स न्यूज

मालेगाव, दि. 11 (उमाका वृत्तसेवा): मालेगाव अजंग-रावळगाव टप्पा क्रमांक 3 औद्योगिक क्षेत्राकरिता उद्योजकांसाठी 10 जून 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. तथापी कोविड-19 या महामारीच्या प्रादुर्भावामुळे इच्छुकांना अर्ज करण्यासाठी शुक्रवार 18 जून 2021 दुपारी 5 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदत वाढ देण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे. याबाबत सविस्तर माहिती व अर्ज महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या www.midcindia.org या संकेतस्थळावर उपलब्ध असून तालुक्यातील अधिकाधिक उद्योजकांनी विहीत मुदतीत अर्ज करण्याचे आवाहन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.

अजंग-रावळगाव औद्योगिक क्षेत्र वाटपा संदर्भात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने सरळ पद्धतीने औद्योगिक भूखंड वाटप अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती करिता राखीवसह “जसे आहे तसे व जेथे आहे तेथे” (As is where is basis) वर वाटप करण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविले आहेत. अजंग-रावळगाव टप्पा क्रमांक 3 या औद्योगिक क्षेत्रासाठी 80.73 हेक्टर आर. क्षेत्रात सुमारे 393 भूखंड वाटपास उपलब्ध असल्याचेही मंत्री श्री.भुसे यांनी नमूद केले आहे.

भूखंडांची संख्या व क्षेत्रामध्ये बदल करण्याचे अधिकार महामंडळाने राखून ठेवले असून यासाठी अटी व शर्ती लागू राहतील, अधिक माहितीसाठी कृपया संकेतस्थळ www.midcindia.org पहावे, तर कार्यालयीन वेळेत व कार्यालयीन दिवशी या कार्यालयाचा संपर्क क्रं. 8422944043 यावर संपर्क साधण्याचे आवाहन महाव्यवस्थापक, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र शासन यांनी केले आहे.

About Shivshakti Times

Check Also

तुम्हाला KYC साठी कॉल किंवा मेसेज आल्यास सावधान

तुम्हाला KYC साठी कॉल किंवा मेसेज आल्यास सावधान-गृह मंत्रालयाचा अलर्ट! आपली बँक रिकामी होऊ शकते …

सिक्स सिग्मा व सनराईज रुग्णालय बनावट कागदपत्रांच्या आधारे सुरू केल्याप्रकरणी संचालकावर गुन्हा दाखल

मनपा आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे यांचा पदभार काढला मालेगाव : प्रतिनिधी कोरोना रूग्णांकडून अव्वाच्या …

अँड. धनंजय देवरे यांची न्यायाधीशपदी नियुक्ती

अँड. धनंजय देवरे यांची न्यायाधीशपदी नियुक्ती शिवशक्ती टाइम्स न्यूज मुख्य संपादक -जयेश रंगनाथ सोनार (दाभाडे) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *