Breaking News

मतदार यादीमध्ये छायाचित्र नसलेल्या मतदारांनी तात्काळ छायाचित्र उपलब्ध करून द्यावीत: उपविभागीय अधिकारी डॉ.शर्मा

मतदार यादीमध्ये छायाचित्र नसलेल्या मतदारांनी तात्काळ छायाचित्र उपलब्ध करून द्यावीत: उपविभागीय अधिकारी डॉ.शर्मा

शिवशक्ती टाइम्स न्यूज

मालेगाव, दि. 14 (उमाका वृत्तसेवा):  भारत निवडणूक आयोगाकडून ज्या मतदारांची छायाचित्र मतदार यादीत उपलब्ध नाहीत अशा मतदारांकडून छायाचित्र उपलब्ध करुन मतदार यादी अद्यावत करण्याच्या सुचना प्राप्त झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने मालेगाव मध्य विधानसभा-114 मतदार संघाच्या निवडणूक कार्यालयाकडून क्षेत्रीय स्तरावरील केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांना सुचना देण्यात आल्या आहेत. मालेगाव मध्य विधानसभा मतदार संघातील जवळपास 5 हजार 440 मतदारांची छायाचित्र मतदार यादीत नसल्याचे दिसून येत आहे. अशा मतदारांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी  मतदार यादीतील आपले छायाचित्र येत्या आठ दिवसात अद्यावत करुन घ्यावेत.
मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांचे छायाचित्र हे मयत अथवा स्थलांतरीत असल्याने छायाचित्र उपलब्ध होत नसावेत या निष्कर्षाप्रती मतदार नोंदणी अधिकारी आलेले असल्याने अशा मतदारांची नावे मतदार यादीतून वगळणेबाबत कार्यवाही करणे आवश्यक आहे. ज्या मतदारांची छायाचित्र मतदार यादीत नाहीत अशा सर्व मतदारांना त्यांचे नाव मतदार यादीतून वगळणेबाबत पूर्व सुचना देणे आवश्यक असल्याने हे प्रसिध्दी पत्रक प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून 8 दिवसाच्या आत मतदारांनी त्यांच्या मतदार यादी भागातील संबंधीत केंद्रस्तरीय अधिकारी (BLO), मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मालेगाव यांचेकडे आपले छायाचित्र जमा करावेत. मुदतीनंतर छायाचित्र नसलेल्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याची कार्यवाही करण्यात येईल याची मतदारांनी नोंद घ्यावी असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी डॉ.विजयानंद शर्मा यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

About Shivshakti Times

Check Also

राष्ट्रीय जनगणनेत ओबीसींची जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे

राष्ट्रीय जनगणनेत ओबीसींची जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे- वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन शिवशक्ती टाइम्स न्यूज …

आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नांने नगरविकास मंत्र्यांची नांदगाव ला भरघोस मदत

आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नांने नगरविकास मंत्र्यांची नांदगाव ला भरघोस मदत शिवशक्ती टाइम्स न्यूज – …

नाशिक -मुंबई राष्ट्रीय महामार्गाची तातडीने दुरुस्ती करा मंत्री छगन भुजबळ यांचे आदेश

वडपे ते गोंदे आणि वडपे ते मुलुंड टोल नाका परिसरातील रस्त्यांच्या कामासाठी मंत्री छगन भुजबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *