Breaking News

केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवेंच्या जनसंपर्क कार्यालयाची झडती घेणारे 5 पोलीस निलंबित; दानवेंच्या तक्रारीनंतर कारवाई.

केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवेंच्या जनसंपर्क कार्यालयाची झडती घेणारे 5 पोलीस निलंबित; दानवेंच्या तक्रारीनंतर कारवाई.

शिवशक्ती टाइम्स न्यूज

प्रतिनिधी – युसूफ पठाण

💠केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जाफराबाद इथल्या जनसंपर्क कार्यालयाची कोणत्याही कायदेशीर परवानगीशिवाय झाडाझडती केल्याप्रकरणी दोन फौजदारांसह पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. रावसाहेब दानवे यांच्या तक्रारीवरुन पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी ही कारवाई केली.

⭕पोलीस उपनिरीक्षक नितीन खुशालसिंग काकरवाल,
⭕पोलीस उपनिरीक्षक युवराज सुभाष पोठरे,
⭕पोलीस हेड कॉन्स्टेबल मंगलसिंग रायसिंग सोळंके,
⭕पोलीस कॉन्स्टेबल सचिन उत्तमराव तिडके आणि
⭕पोलीस कॉन्स्टेबल शाबान जलाल तडवी अशी निलंबित पोलीस कर्मचाऱ्यांची नावं आहेत.

💠11 जूनला संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी कोणती कायदेशीर परवानगी न घेता जालना जिल्ह्यातील जाफराबाद इथल्या केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जनसंपर्क कार्यलयाची तपासणी केली, असा आरोप आहे.

💠यावेळी या पोलीस कर्मचाऱ्यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. तसंच कामकाजाच्या संचिका देखील सोबत नेल्या, अशी तक्रार रावसाहेब दानवे यांनी केली होती.

💠तपासणी करुन नेमकं काय निष्पन्न झालं याचा खुलासा रावसाहेब दानवे यांनी मागितला होता. या प्रकरणी चौकशी करुन पोलिसांचं वर्तन बेकायदेशीर आणि बेशिस्तपणाचं असल्याचा ठपका ठेवत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी काल (14 जून) ही कारवाई केली.

About Shivshakti Times

Check Also

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत निवेदन- राहुल भाईजी पवार

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन- राहुल भाईजी पवार शिवशक्ती …

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार शिवशक्ती टाइम्स न्युज – (प्रतिनिधी युसूफ पठाण) यापुढे वाहतूक …

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन शिवशक्ती …

Leave a Reply

Your email address will not be published.