Breaking News

माळमाथ्यावरील रस्त्याची दुरावस्था ग्रामस्थांनी केले खडयात वृक्षरोपण

मालेगाव : प्रतिनिधी 
माळमाथ्यावरील गिगाव, रोंझाने, सिताने, खलाने, बोधे, माल्हणगाव या गावातील रस्त्यांची जीवघेणी दुरावस्था झाली आहे. लोकप्रतिनिधी यांना जाग यावी यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी एकत्र येत रस्त्यातील खड्यात वृक्षारोपण केले.
माळमाथ्यावरील अनेक गावाच्या रस्त्याची हिच परिस्थिती आहे. रस्त्यांवर खड्डे पडले असल्याने वाहन चालकांना कसरत करीत वाहन चालवावे लागते. खड्डे टाळण्याच्या नादात वाहन घसरण्याच्या प्रमाणात देखील वाढ झाली आहे. गिगाव, रोंझाने, सिताने, खलाने, बोधे, माल्हणगाव या गावातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या भागातील रस्ते दुरूस्त करावे अशी मागणी करून ही दुर्लक्ष होत असल्याने लोकप्रतिनिधीचे लक्ष वेधून घेण्यासाठी व रस्त्यांचे त्वरित कामे होण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामपंचायतींनी सामुहिक ठराव करून तो त्यांच्या पर्यंत पोहचविण्याचा निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी ग्रामस्थांनी एकत्र येऊन रस्त्यातील खड्यात वृक्षारोपण केले. याप्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य विष्णू जाधव, शिवदास हिरे, प्रा. हिरालाल नरवाडे, शिवाजी नजन, समाधान पवार, गोरख भवर, गोकुळ भवर, विजय वाघ, प्रकाश दातीर, कैलास देवरे, बापू भामरे, सिताराम आचट, सागर भवर, खुशाल सुर्यवंशी, मोटु शेवाळे, योगेश शेवाळे आदी उपस्थित होते. प्रा. नरवाडे, भामरे, पवार व नजन यांनी मनोगत व्यक्त करून सदर रस्त्यांची कैफियत मांडली.

कळवाडी गटातील रस्त्यांची फार मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. यातून नागरिकांना फार मोठ्या मनस्तापाला तोंड द्यावे लागते. तरी शासन प्रशासनाने त्वरीत या रस्त्यांची दुरुस्ती करावी. – प्रा. हिरालाल नरवाडे (ग्रा.पं.सदस्य, बोधे)

पंचक्रोशीतील रस्त्यांवरून वापरतांना शेतकरी, विद्यार्थी, हातविक्रीवाले, दवाखान्यातील रुग्ण व दैनंदिन ये-जा करणाऱ्यांची मोठी कसरत होते. सदर रस्त्यांची जलद कामे व्हावीत. – समाधान पवार (ग्रा.पं. सदस्य, गिगाव)

About Shivshakti Times

Check Also

भुकेल्याची भुक भागविण्याचे महत्वपूर्ण काम करते शिवभोजन केंद्र : कृषीमंत्री भुसे

सामान्य रुग्णालय परिसरात शिवभोजन केंद्राचे उद्घाटन शिवशक्ती टाइम्स न्यूज मालेगाव : प्रतिनिधी अल्प दरासह संकट …

कृषिरत्न फाउंडेशनतर्फे आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांसाठी बी-बियाणे, खते व साडीचोळी कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांच्या हस्ते वाटप

सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील कृषिरत्न फाउंडेशनने कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या अनाथ कुटुंबांना तसेच आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांसाठी …

राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केलेल्या मागणीला यश

राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केलेल्या मागणीला यश केंद्र सरकारने दिला खत सबसिडी वाढविण्याचा निर्णय …

Leave a Reply

Your email address will not be published.