Breaking News

सटाणा : तक्रार करणाऱ्या शेतकऱ्याला दुकानदाराकडून बेदम मारहाण

तक्रार करणाऱ्या शेतकऱ्याला दुकानदाराकडून बेदम मारहाण

मालेगाव : प्रतिनिधी

विद्युत पंपाचे नवीन स्टार्टर सुरु करताच शॉर्टसर्किट होऊन तरुण शेतकऱ्याचा हात भाजला. याविषयी तक्रार करणाऱ्या या ग्राहकाला दुकानदाराने बेदम मारहाण केल्याचा प्रकार सटाणा येथे मंगळवारी (दि. १६) रोजी घडला. यात तरुणाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्या कपाळाला व उजव्या डोळ्याला गंभीर इजा झाली आहे. या प्रकरणी कठोर कारवाईसाठी अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खाडवी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.
बागलाण तालुक्यातील भाक्षी येथील तरुण शेतकरी सुनिल रौंदळ यांनी सटाणा येथील स्टेट बँके समोरील एका इलेक्ट्रॉनिक दुकानातील ब्रँडेड कंपनीचे स्टार्टर मंगळवारी खरेदी केले. कारागिराकडून त्याची विहिरीवर जोडणी केली. ते सुरु करताच शॉर्टसर्किट होऊन रौंदळच्या हाताची बोट भाजली. या प्रकाराविषयी त्यांनी दुकानदाराकडे मंगळवारी तक्रार केली. दुकानदाराने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने शाब्दीक खटके उडून दुकानदाराच्या मुलाने थेट नादुरुस्त स्टार्टर शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर मारले. यामुळे तरुण शेतकऱ्याच्या कपाळावर खोलवर जखम होऊन ओठही फाटले. अशाही अवस्थेत दुकानदार व कर्मचाऱ्याने शेतकऱ्याला बेदम मारहाण केल्याने तो रक्तबंबाळ झाला. जखमी शेतकऱ्याने सटाणा पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्याचे वैद्यकीय प्रमाणपत्रही सादर झाले. परंतु मारहाण करणाऱ्यांवर राजकीय दबावातून कारवाई टाळण्याचे प्रयत्न झाल्याने शेतकऱ्याने बुधवारी अपर पोलिस अधीक्षक कार्यालयात तक्रार दाखल करुन संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.

About Shivshakti Times

Check Also

‼️ वाहतूक पोलिसांची कोर्टाने केली कानउघाडणी‼️

‼️ वाहतूक पोलिसांची कोर्टाने केली कानउघाडणी‼️ चलन अथवा दंडाची रक्कम जागीच भरण्याबाबत जबरदस्ती करू नये,” …

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ओझर विमानतळावर स्वागत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ओझर विमानतळावर स्वागत शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी -युसूफ पठाण मुख्यमंत्री उद्धव …

मालेगावात अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणारे गुन्हेगार जेरबंद

मालेगावात अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणारे गुन्हेगार जेरबंद तीन देशी बनावटीचे पिस्टल व सात जिवंत काडतुसे हस्तगत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *