Breaking News

BHR’ घोटाळ्या प्रकरणी औरंगाबाद येथील एका दैनिकाच्या मालकासह जळगांव येथील मद्य व्यवसायिकास अटक.

BHR’ घोटाळ्या प्रकरणी औरंगाबाद येथील एका दैनिकाच्या मालकासह जळगांव येथील मद्य व्यवसायिकास अटक.

शिवशक्ती टाइम्स न्यूज
प्रतिनिधी – युसूफ पठाण

💠बीएचआर फसवणूक व अपहार प्रकरणात पुणे आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी पुन्हा जळगाव शहर, जामनेर, पाळधी, भुसावळ, औरंगाबाद, धुळे, मुंबई, अकोला, पुणे या सहा जिल्ह्यात एकाच वेळी छापेमारी करत तब्बल बारा जणांना ताब्यात घेतले.

💠जळगाव शहरातून भागवत भंगाळे यांना मॉर्निंग वॉक करताना पोलिसांनी सहा वाजता तब्यात घेतले तर भुसावळ येथे माजी उपनगराध्यक्षाला ही ताब्यात घेण्यात आलेले आहे. या प्रकरणी डेक्कन, पिपंरी आणि पुणे ग्रामीण पोलिसांमध्ये गुन्हे दाखल आहेत.

💠पतसंस्थेमध्ये अवसायक जितेंद्र कंडारे व त्याच्या साथीदारांनी केलेल्या गैरव्यवहाराचे पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तब्बल एक ट्रक भरुन पुरावे यापुर्वी गोळा केले आहेत.

💠त्यात प्रामुख्याने जळगावमधील वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या धाडीत मिळालेली कागदपत्रे, शपथपत्रे, तसेच लॅपटॉप, पीसीओसह मोठ्या प्रमाणावर डिजिटल साहित्यही हस्तगत करण्यात आले आहेत.

💠याबरोबरच औरंगाबाद व अन्य ठिकाणी केलेल्या तपासणीतअनेक महत्वपूर्ण कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली आहेत. त्यानुसार पोलिसांनी कारवाईचा धडाका लावला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

💠अटक करण्यात आलेल्यांची नावे खालील प्रमाणे आहे 👇🏻

➖अंबादास आबाजी मानकापे (औरंगाबाद),
➖भागवत भंगाळे (जळगाव),
➖छगन झालटे (जामनेर)
➖जितेंद्र रमेश पाटील (जामनेर),
➖आसिफ मुन्ना तेली (भुसावळ),
➖जयश्री शैलेश मनियार (जळगाव),
➖संजय तोताळा (जळगाव),
➖राजेश लोढा (जामनेर),
➖प्रितेश चंपालाल जैन (धुळे),
➖जयश्री अंतिम तोतला (मुंबई),
➖प्रेम नारायण कोवगता (जळगाव),
➖प्रमोद किसनराव कापसे (अकोला)

💠पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता व आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

About Shivshakti Times

Check Also

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत निवेदन- राहुल भाईजी पवार

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन- राहुल भाईजी पवार शिवशक्ती …

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार शिवशक्ती टाइम्स न्युज – (प्रतिनिधी युसूफ पठाण) यापुढे वाहतूक …

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन शिवशक्ती …

Leave a Reply

Your email address will not be published.