Breaking News

मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पाठिंबाच, कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या – छगन भुजबळ

मराठा समाज आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी केंद्र सरकारच्या मदतीची गरज

सर्वांना एकत्रित करण्याची संभाजीराजे यांची भूमिका सामंजस्याची

नाशिक,दि.२१ जून:- मराठा समाजाच्या आरक्षणाला माझा आणि माझ्या पक्षाचा नेहमीच पाठिंबा राहीला आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे ही सर्व पक्षीय भुमिका असून माझी व माझ्या पक्षाची देखील हीच भुमिका आहे. त्या भूमिकेशी मी पुर्णपणे सहमत असून मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबाच आहे असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिक येथे मराठा क्रांती मोर्चातर्फे आयोजित करण्यात आलेल्या मुक आंदोलनात व्यक्त केले.

नाशिक शहरातील रावसाहेब थोरात सभागृहाशेजारील मैदानावर छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या मुक आंदोलनाला मराठा क्रांती मोर्च्याचे पदाधिकारी आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या निमंत्रणावरून पालकमंत्री छगन भुजबळ हे उपस्थित राहिले आणि आपली भुमिका स्पष्ट करत मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शविला. यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की,आज मराठा आणि ओबीसी दोन्हीही समाज अडचणीत आहे,काही लोक जाणीवपुर्वक मराठा समाज व ओबीसी समाजामध्ये वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आमची दैवतं ही एकच आहेत.छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू-फुले-आंबेडकर ही आमची दैवत आहेत त्यामुळे कोणीही आमच्यात द्वेष पसरवण्याचे काम करू नये असे त्यांनी स्पष्ट केले.

मराठा समाजाच्या आरक्षणासह ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र सरकारची भूमिका ही अतिशय महत्वाची असल्याचे मत देखील मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. राज्य सरकार मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सकारात्मक आहे. ज्या ज्या वेळेस विधिमंडळात याबाबत प्रश्न उपस्थित झाले त्या त्या वेळेस आम्ही पाठिंबाच दिला आहे. आज आरक्षणाचा प्रश्न हा दोन समाजातील नसुन हा व्यवस्थेविरुद्ध लढा आहे आणि त्याला माझा नेहमीच पाठिंबा असेल असे मत देखील मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी सर्वांना एकत्रित करण्याची जी भुमिका घेतली आहे ती स्वागतार्ह आहे. सर्वांना एकत्रित करताना संभाजीराजे हे अतिशय सामंजस्याची भुमिका घेत असल्याने त्यांचे कौतुक देखील मंत्री छगन भुजबळ यांनी केले. मराठा क्रांती मोर्चातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनाला छत्रपती संभाजीराजे, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह विविध पक्षांचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

About Shivshakti Times

Check Also

माळमाथ्यावरील रस्त्याची दुरावस्था ग्रामस्थांनी केले खडयात वृक्षरोपण

मालेगाव : प्रतिनिधी  माळमाथ्यावरील गिगाव, रोंझाने, सिताने, खलाने, बोधे, माल्हणगाव या गावातील रस्त्यांची जीवघेणी दुरावस्था …

राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केलेल्या मागणीला यश

राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केलेल्या मागणीला यश केंद्र सरकारने दिला खत सबसिडी वाढविण्याचा निर्णय …

नाशिक जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा-जिल्हाधिकारी

नाशिक जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा शिवशक्ती टाइम्स न्यूज नाशिक – सर्व नागरिकांना सतर्क करण्यात येते …

Leave a Reply

Your email address will not be published.