Breaking News

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या घरावर ई.डी.चा छापा……

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या घरावर ई.डी.चा छापा……

शिवशक्ती टाइम्स न्यूज

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील निवासस्थानी सक्तवसुली संचालनायलयाने (ई.डी.) छापा टाकला आहे.
सकाळी ई.डी.ने देशमुख यांच्या जी.पी.ओ. चौकातील निवासस्थानी तसंच त्यांच्या निकटवर्तीयांकडे छापे टाकले.
त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
रात्रीच ई.डी.चे पथक मुंबईहून नागपुरात दाखल झालं होतं.
सकाळी स्थानिक ई.डी. अधिकाऱ्यांच्या मदतीने मुंबईतील पथकाने देशमुख यांच्या जी.पी.ओ. चौकातील घरी व निकटवर्तीयांकडे धाड टाकली.
१६ जूनला ई.डी.च्या तीन पथकांनी अनिल देशमुख यांच्याशी संबंधित दोन सी.ए. व एका कोळसा व्यापाऱ्याच्या घरीही छापे टाकले होते.
ई.डी. देशमुख यांच्याकडेही झाडाझडती घेण्याची शक्यता या छाप्यांमुळे बळावली होती.
अवघ्या नऊ दिवसातच ई.डी.ने हा छापा टाकला आहे.
दरम्यान अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घराबाहेर सी.आर.पी.एफ. जवानांना तैनात करण्यात आलं असून कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे.

११ मे रोजी ई.डी.ने मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.
दुसरीकडे सी.बी.आय.नेही अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलेला असून तपास सुरु आहे.
सी.बी.आय.कडून अनिल देशमुख यांची चौकशीदेखील करण्यात आली आहे.
सी.बी.आय.ने दाखल केलेल्या एफ.आय.आर.चा अभ्यास केल्यानंतर ई.डी.ने गुन्हा दाखल करत कारवाईला सुरुवात केली होती.
‘देशमुख प्रकरणातील तपासात राज्य सरकारचा असहकार’ गृहमंत्रीपदाचा राजीनामा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे वादात अडकल्यानंतर अनिल देशमुख यांनी ५ एप्रिल रोजी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.

⭕ अनिल देशमुखांवर नक्की कोणते आरोप आहेत?

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील निवासस्थानी सक्तवसुली संचालनायलयाने (ई.डी.) सकाळी छापा टाकला आहे.
ई.डी.ने देशमुख यांच्या जी.पी.ओ. चौकातील निवासस्थानी तसंच त्यांच्या निकटवर्तीयांच्या घरांवर छापे टाकलेत.
त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
पण अनिल देशमुख यांच्यावर नक्की काय आरोप आहेत ?
ज्यासंदर्भात ही कारवाई करण्यात आलीय जाणून घेऊयात…
देशमुख यांनी महिना १०० कोटी रुपयांचा हप्ता किंवा खंडणी गोळा करण्याची सूचना निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंसह अन्य अधिकाऱ्यांना दिली होती.
तसेच पोलीस अधिकाऱ्यांची बदली प्रक्रिया,
नियमित कामकाजातही देशमुख यांचा हस्तक्षेप वाढला होता,
असे आरोप करणारे पत्र मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मे महिन्याच्या सुरुवातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले होते.

⭕सी.बी.आय.च्या अहवालामध्ये काय आहे ?

तसेच या तक्रारीची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत चौकशी व्हावी,
अशी मागणी करणारी याचिका मे.उच्च न्यायालयात केली होती.
त्यावरील सुनावणीत मे.उच्च न्यायालयाने सी.बी.आय.ला प्राथमिक चौकशी करून दोन आठवड्यांत अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होता.
सी.बी.आय.च्या पथकाने प्राथमिक चौकशी अहवाल दिल्ली येथील मुख्यालयास पाठवला.
त्यात देशमुख यांनी पद,
अधिकारांचा गैरवापर केला, अप्रामाणिकपणे कर्तव्य बजावत गैरफायदा घेतला,
असे निरीक्षण नमूद होते.
देशमुख यांची कृती दखलपात्र गुन्हा नोंद होण्यास पात्र ठरते,
असे निरीक्षण त्यात नमूद होते.
त्याआधारे सी.बी.आय.ने देशमुख यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील कलमांनुसार गुन्हा नोंदवला.

About Shivshakti Times

Check Also

‼️ वाहतूक पोलिसांची कोर्टाने केली कानउघाडणी‼️

‼️ वाहतूक पोलिसांची कोर्टाने केली कानउघाडणी‼️ चलन अथवा दंडाची रक्कम जागीच भरण्याबाबत जबरदस्ती करू नये,” …

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ओझर विमानतळावर स्वागत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ओझर विमानतळावर स्वागत शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी -युसूफ पठाण मुख्यमंत्री उद्धव …

मालेगावात अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणारे गुन्हेगार जेरबंद

मालेगावात अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणारे गुन्हेगार जेरबंद तीन देशी बनावटीचे पिस्टल व सात जिवंत काडतुसे हस्तगत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *