Breaking News

ट्रॅफिकमध्ये अडकल्याने रुग्णालयात जाणाऱ्या महिलेचा मृत्यू

⭕ट्रॅफिकमध्ये अडकल्याने रुग्णालयात जाणाऱ्या महिलेचा मृत्यू;
⭕राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केला शोक…..

शिवशक्ती टाइम्स न्यूज (प्रतिनिधी – युसूफ पठाण)

राष्ट्रपती रामनाथ कोविंद सध्या कानपूर दौऱ्यावर आहेत.
त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात सुरुक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
राष्ट्रपतींच्या या दौऱ्यामुळे शहरात अनेक ठिकाणी वाहतुकींच्या रस्त्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
यामुळे झालेल्या ट्रॅफिकमध्ये अडकून एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
महिलेला उपचारासाठी रुग्णालयात नेले जात असताना गोविंदपुरी पुलावर वाहतूक बंद करण्यात आली होती.
यावेळी ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या महिलेची प्रकृती अधिकच बिकट झाली आणि जेव्हा रुग्णालयात पोहोचली तेव्हा खूप उशीर झाला होता.
डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले.
भारतीय उद्योग संघटनेच्या स्थानिक महाविद्यालयाच्या महिला शाखेच्या अध्यक्ष वंदना मिश्रा (५०) गोविंदपुरी पुलावरील ट्रॅफिकमध्ये अडकल्या होत्या.
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या भेटीमुळे येथे वाहतूक बंद करण्यात आली होती.
४५ मिनिटे या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली होती अशी माहिती देण्यात आली आहे.
ट्रॅफिक सुटल्यानंतर वंदना यांना रुग्णालयामध्ये पोहोचण्यासाठी सुमारे दीड तास लागला.
त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
गोविंदपुरी पुलावर तैनात असलेल्या पोलिसांना वारंवार विनंती करूनही रस्ता उघडला गेला नाही,
असा आरोप परिवाराने केला आहे.
त्यानंतर कानपूरचे पोलिस आयुक्त असीम अरुण यांनी या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.
दरम्यान, या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक आणि तीन हेड कॉन्स्टेबलना निलंबित करण्यात आले आहे.

About Shivshakti Times

Check Also

‼️ वाहतूक पोलिसांची कोर्टाने केली कानउघाडणी‼️

‼️ वाहतूक पोलिसांची कोर्टाने केली कानउघाडणी‼️ चलन अथवा दंडाची रक्कम जागीच भरण्याबाबत जबरदस्ती करू नये,” …

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ओझर विमानतळावर स्वागत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ओझर विमानतळावर स्वागत शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी -युसूफ पठाण मुख्यमंत्री उद्धव …

मालेगावात अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणारे गुन्हेगार जेरबंद

मालेगावात अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणारे गुन्हेगार जेरबंद तीन देशी बनावटीचे पिस्टल व सात जिवंत काडतुसे हस्तगत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *