Breaking News

बार मालकांकडून वसूल केलेले तीन कोटी देशमुखांनी संस्थेच्या नावे वळवले, ई.डी. …..

बार मालकांकडून वसूल केलेले तीन कोटी देशमुखांनी संस्थेच्या नावे वळवले, ई.डी. …..

शिवशक्ती टाइम्स न्यूज (प्रतिनिधी – युसूफ पठाण)

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री यांची सध्या ई.डी.कडून चौकशी सुरु आहे.
या चौकशीदरम्यान ई.डी.ने असा आरोप केला आहे की, निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे याने अनिल देशमुख यांच्या सांगण्यावरुन डिसेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीमध्ये मुंबईच्या काही पब्स, बारच्या मालकांकडून चार कोटीहून अधिक वसुली केली.
ई.डी.च्या म्हणण्यानुसार वाझेने देशमुखांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांना हे पैसे दिले.
त्यानंतर ह्या पैश्यातला एक वाटा दिल्लीतल्या चार शेल कंपन्यांच्या माध्यमातून नागपूरातल्या एका चॅरिटेबल ट्रस्टकडे वळवण्यात आला.
मुंबईतील बार, पब यांच्या मालकांकडून उकळलेल्या ४.७० कोटी रुपयांपैकी ३.१८ कोटी रुपये देशमुख यांनी त्यांचा मुलगा ऋषिकेशच्या माध्यमातून नागपूरच्या श्री साई शिक्षण संस्था ट्रस्ट या संस्थेत फिरवले.
संस्थेत देणगी स्वरुपात ही रक्कम जमा झाल्याचा आभास निर्माण करण्यासाठी आधी ही रक्कम दिल्लीतील दोन व्यक्तींना हवालाद्वारे पोच केली गेली.
अनिल देशमुख यांच्या दोन सहायकांना अटक नंतर या दोन व्यक्तींच्या नावे नोंद बोगस कंपन्यांच्या खात्यातून ही रक्कम संस्थेत वळविण्यात आल्याचा दावा ई.डी.ने मे.विशेष न्यायालयात केला.
या व्यवहारांमध्ये देशमुख यांचा स्वीय सहायक कुंदन शिंदे प्रत्यक्ष सहभागी असल्याचेही एन.आय.ए.ने
मे.न्यायालयाला सांगितले.
सचिन वाझे यांनी दिलेल्या जबाबात देशमुख यांनी काही प्रकरणांच्या तपासाबाबत थेट सूचना दिल्याचे सांगितले.
तसेच एका बैठकीत देशमुख यांनी शहरातील बार, पब आदी आस्थापनांकडून महिन्याकाठी तीन लाख रुपये गोळा करण्यासही सांगितले.
त्यासाठी शहरातील बार मालकांची बैठक घेतली.

About Shivshakti Times

Check Also

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत निवेदन- राहुल भाईजी पवार

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन- राहुल भाईजी पवार शिवशक्ती …

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार शिवशक्ती टाइम्स न्युज – (प्रतिनिधी युसूफ पठाण) यापुढे वाहतूक …

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन शिवशक्ती …

Leave a Reply

Your email address will not be published.