Breaking News

पुण्यात महिला डॉक्टरच्या बाथरूम मध्ये एमडी डॉक्टरने बसविला स्पाय कॅमेरा

पोलिसांनी केले बडया एमडी डाॅक्टरला गजाआड,
👉तर वैदकीय क्षेत्रात उडाली मोठी खळबळ

शिवशक्ती टाइम्स न्यूज
प्रतिनिधी- युसूफ पठाण

पुणे –भारती विद्यापीठ परिसरातील एका प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेच्या रूममध्ये स्पाय कॅमेरा लावल्या प्रकरणी पोलिसांनी शहरातील एका बड्या एमडी डॉक्टरला अटक केली आहे.त्याने हे छुपे कॅमेरे लावल्याचे समोरे आल्याने वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.

👉छुपा कॅमेरा असणारा बल्ब अमेझॉनवरून मागवला असल्याचे देखील समोर आले आहे.डाॅक्टर सुजित आबाजीराव जगताप वय 42, असे अटक केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. याप्रकरणी 32 वर्षीय पीडित महिला डॉक्टरने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यावरून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 6 जुलैला घडला होता.

👉पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजित जगताप ये एमडी आहेत.त्यांचा हिराबाग येथे मोठा दवाखाना आहे.ते भारती विद्यापीठ परिसरातील एका हॉस्पीटलमध्ये लेक्चर घेण्यासाठी देखील जात होते.

👉दरम्यान,यातील फिर्यादी एका हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टर आहेत.त्या परिसरातील क्वॉर्टरमध्ये एका मैत्रिणीसीबत राहतात. नेहमीप्रमाणे काम संपल्यानंतर त्या सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास रूमवर परत आल्या.फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेल्यानंतर लाईट लावली.पण, तो बल्ब लागला नाही. बल्ब पाहिला असता तो काहीसा वेगळा वाटल्याने त्यांना शंका आली.त्यांनी इलेक्ट्रिशियनला बोलावून बल्ब दाखवला, तेव्हा इलेक्ट्रिशियनने त्या बल्बमध्ये छुपा कॅमेरा असल्याचे सांगितले. त्यानंतर हा प्रकार समोर आला होता. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती.या गुन्ह्याचा तपास भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक संगीत यादव या तपास करत होत्या.

👉गेल्या 4 दिवसांपासून पोलीस परिसरातील सीसीटीव्ही तसेच येथील सुरक्षा रक्षक आणि फिर्यादी यांना संशय वाटत असलेल्या व्यक्तींकडे चौकशी करत होते.यादरम्यान एका ठिकाणी जगताप कैद झाले. त्यांना चौकशीसाठी बोलविल्यानंतर त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली.पोलिसांनी त्यांना अटक केली.

👉👉👉आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

👉नीलम गोऱ्हे काय म्हणाल्या?

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे पोलीस आयुक्तांना आरोपींचा तातडीने शोध घेण्याचे निर्देश दिले होते. अशाच प्रकारचे किती गुन्हे आरोपीने केले आहेत, याची माहिती मिळावी, याबाबत पुणे पोलीस आयुक्तांना नीलम गोऱ्हे यांनी निवेदन सादर केले. पोलिसांनी लवकरात लवकर या प्रकरणाची चौकशी करावी म्हणजे असे अनेक गुन्हे समोर येऊन समाजातील सर्व महिलांना तसेच फिर्यादी महिला डॉक्टरांना न्याय मिळेल, असेही मत डॉ नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले होते.

👉आरोपींना जामीन न मिळण्याची दक्षता घ्या

आरोपीवर कठोर कारवाई करून त्याला जामीन मिळू नये, याची दक्षता घेण्यात यावी. अशा अपप्रवृत्तीच्या व्यक्तींना कठोर शिक्षा झाल्यास समाजात या गुन्ह्याची पुनरावृत्ती होणार नाही, त्याला निश्चितच आळा बसेल असेही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले होते. महिलांनीही सजग राहून सावधानता बाळगावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले होते.

About Shivshakti Times

Check Also

मटण बनवण्यास उशीर होईल सांगितल्याने पती संतापला, मारहाणीत पत्नीचे दातच पाडले……..

मटण बनवण्यास उशीर होईल सांगितल्याने पती संतापला, ⭕मारहाणीत पत्नीचे दातच पाडले…….. शिवशक्ती टाइम्स न्यूज – …

सांगली खून प्रकरण गुन्हे शाखा युनिट चार पिंपरी-चिंचवड कडून मुख्य आरोपीस 24 तासाच्या आत अटक व गुन्हा उघड

पिंपरी-चिंचवड-  प्रतिनिधी – युसूफ पठाण  याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक 13 सप्टेंबर 2020 रोजी …

 पुणेकरांना दिलासा…! पुणे जिल्ह्यातील मार्गावर सुरू होणार….! एसटीची सेवा – शिवशक्ती टाइम्स न्यूज

🛑 पुणेकरांना दिलासा…! पुणे जिल्ह्यातील मार्गावर सुरू होणार….! एसटीची सेवा 🛑 ✍️ पुणे 🙁  ब्युरो चीफ शिवशक्ती टाइम्स न्यूज …

Leave a Reply

Your email address will not be published.