Breaking News

मनपा प्रभाग १ च्या सभापती पदी शिवसेनेच्या कल्पना वाघ यांची बिनविरोध निवड

मनपा प्रभाग १ च्या सभापती पदी शिवसेनेच्या कल्पना वाघ यांची बिनविरोध निवड

शिवशक्ती टाइम्स न्यूज
प्रतिनिधी- युसूफ पठाण

मालेगाव:-दि 14 महानगरपालिकेच्या चारही प्रभाग सभापतींची निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सूरज मांढरे,मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी,नगरसचिव श्याम बुरकुल यांच्या उपस्थितीत दुरदृष्य प्रणाली द्वारे पार पडली.
आज पार पडलेल्या प्रभाग क्र 1 च्या निवडनिकीतून भाजपचे भरत बागुल यांनी ऐनवेळी माघार घेतल्यामुळे शिवसेनेच्या सौ. कल्पना वाघ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी कल्पना वाघ यांना दुसऱ्यांदा संधी दिली व यावेळीही त्या निवडून आल्यात.त्यामुळे वाघ यांनी भुसे यांचे आभार मानले.
यावेळी शिवसेनेचे उपमहापौर निलेश आहेर,स्थायी समिती सभापती राजाराम जाधव,सखाराम घोडके,नगरसेवक जयप्रकाश बच्छाव,नगरसेविका ज्योती भोसले,जिजाबाई पवार,पुष्पा गंगावणे, प्रतिभा पवार,आशा अहिरे, जिजाबाई बच्छाव,उपस्थित होते.
याप्रसंगी शिवसेना पक्ष कार्यालयाच्या वतीने सभापती कल्पना वाघ यांचा सत्कार व त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्यात.
यावेळी कार्यालय संपर्कप्रमुख प्रमोद शुक्ला, युवासेना महाराष्ट्र राज्य विस्तारक अविष्कार भुसे, मनोहर बच्छाव, भीमा भडणगे, विनोद वाघ,राजेश गंगावणे, पप्पू पवार,प्रकाश अहिरे आदी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

About Shivshakti Times

Check Also

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत निवेदन- राहुल भाईजी पवार

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन- राहुल भाईजी पवार शिवशक्ती …

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार शिवशक्ती टाइम्स न्युज – (प्रतिनिधी युसूफ पठाण) यापुढे वाहतूक …

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन शिवशक्ती …

Leave a Reply

Your email address will not be published.