Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार घराघरात पोहचवा : भोसले

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार घराघरात पोहचवा : भोसले

शिवशक्ती टाइम्स न्यूज
संपादक -जेयश सोनार (दाभाडे)

मालेगाव : प्रतिनिधी
आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समितीसह मालेगाव महानगर पालिकेची निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभुमीवर शहरासह तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार आणि चिन्ह घराघरात पोहचविण्याचे आवाहन मामको बँकेचे संचालक राजेंद्र भोसले यांनी केले.
येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नुतन पदाधिकाऱ्यांच्या सत्कार सोहळ्या प्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. जयंत पवार, प्रसाद हिरे उपस्थित होते.
मालेगाव महानगर राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार आसिफ शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव दिनेश ठाकरे, मालेगाव महानगर राष्ट्रवादी कार्याध्यक्ष अनंत भोसले, एजाज उमर, शाहिद रेशीमवाले, शकील शाह, मालेगाव महानगर राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष यास्मिन सैय्यद, महिला कार्याध्यक्ष सुचेता सोनवणे, शाहीन अन्सारी, मालेगाव महानगर राष्ट्रवादी सेवादल जिल्हाध्यक्ष रियाज अली युसूफ अली, मालेगाव महानगर राष्ट्रवादी किसान सेल जिल्हाध्यक्ष बीपीन बच्छाव, मालेगाव महानगर राष्ट्रवादी) मच्छिमार सेल जिल्हाध्यक्ष संदीप शिवदे आदींची निवड झाल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देतांना माजी आमदार शहर जिल्हा अध्यक्ष असिफ शेख यांनी पक्षाला बळकटी देत आगामी महानगर पालिकेच्या निवडणुकीत पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा संकल्प केला. या प्रसंगी विनोद चव्हाण, विनोद शेलार, सागर पाटील, डॉ. पवार, हिरे, अँड. सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. योगेश बागुल यांनी प्रास्ताविक केले. रोहित तेली यांनी सूत्रसंचालन केले तर प्रणव आभोणकर यांनी आभार मानले. यावेळी किशोर इंगळे, अशोक ह्याळीज, राजेंद्र पवार, निलेश पाटील, अरुण आहिरे, आबा साळुंके, प्रशांत महाजन, हेमलता मानकर, योगिता ठुसर, सुनीता कुलकर्णी, धनंजय पाटील, योगेश भावसार, भगवान बागुल, राजेंद्र सोनवणे, बाळासाहेब हिंगे, अशोक चित्ता, अंबादास ठाकूर, राजेंद्र पाटील, निंबा गुंजाळ, राकेश जगताप, जाबिर शाह आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

About Shivshakti Times

Check Also

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत निवेदन- राहुल भाईजी पवार

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन- राहुल भाईजी पवार शिवशक्ती …

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार शिवशक्ती टाइम्स न्युज – (प्रतिनिधी युसूफ पठाण) यापुढे वाहतूक …

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन शिवशक्ती …

Leave a Reply

Your email address will not be published.