Breaking News

प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांकडून रुग्णालयाची तोडफोड

प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांकडून रुग्णालयाची तोडफोड

शिवशक्ती टाइम्स न्यूज
मालेगाव : प्रतिनिधी
येथील ममता रूग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या तालुक्यातील रावळगाव येथील महिलेचा मृत्यू झाल्यामुळे संतापलेल्या मृत महिलेच्या नातेवाईकांनी रूग्णालयाची तोडफोड केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. जो पर्यंत डॉक्टरवर गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याच्या भूमिकेवर नातेवाईक ठाम राहिल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. राजकीय पदाधिकारी व पोलिस प्रशासनाने नातेवाईकांची समजूत काढत गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईक शांत झाले.
रावळगाव येथील सविता अजय खरे (२०) या गर्भवती महिलेला मालेगाव येथील सटाणा रोडवरील ममता रूग्णालया मध्ये रविवारी (दि. १८) रोजी दाखल करण्यात आले होते. या महिलेचा दुसऱ्या दिवशी सोमवारी (दि. १९) रोजी सकाळी १०:३० वाजेच्या दरम्यान मृत्यू झाला. या घटनेची माहिती मृत महिलेच्या नातेवाईकांना मिळताच त्यांनी एकच आक्रोश करीत रूग्णालयाकडे धाव घेतली.
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सविताचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली. दरम्यान परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने किल्ला व छावणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र मृत महिलेच्या नातेवाईकानी संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली. गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याच्या भूमिकेवर नातेवाईक ठाम राहिल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान राजकीय पदाधिकारी व पोलिस प्रशासनाने नातेवाईकांची समजूत काढत गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्याने तब्बल चार ते पाच तास चाललेल्या या घटनेनंतर या महिलेचा मृतदेह शव विच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात हलविण्यात आला. शव विच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती छावणी पोलिसांनी दिली.

About Shivshakti Times

Check Also

‼️ वाहतूक पोलिसांची कोर्टाने केली कानउघाडणी‼️

‼️ वाहतूक पोलिसांची कोर्टाने केली कानउघाडणी‼️ चलन अथवा दंडाची रक्कम जागीच भरण्याबाबत जबरदस्ती करू नये,” …

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ओझर विमानतळावर स्वागत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ओझर विमानतळावर स्वागत शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी -युसूफ पठाण मुख्यमंत्री उद्धव …

मालेगावात अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणारे गुन्हेगार जेरबंद

मालेगावात अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणारे गुन्हेगार जेरबंद तीन देशी बनावटीचे पिस्टल व सात जिवंत काडतुसे हस्तगत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *