Breaking News

मोराची शिकार करणाऱ्यास चार दिवसाची वनकोठडी

मोराची शिकार करणाऱ्यास चार दिवसाची वनकोठडी

शिवशक्ती टाइम्स न्यूज
मालेगाव : प्रतिनिधी
राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराची शिकार करून वाहनाने घेऊन जाणाऱ्या शिकाऱ्यास येथील वनविभाग व पवारवाडी पोलिसांनी गजाआड केले आहे. आरोपीच्या ताब्यातून मोर, त्याची पिसे व एअर गन जप्त करण्यात आली असून वनगुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. डी. कांबळे यांनी दिली. दरमान आरोपी हुजेफ यास सोमवारी (दि. १९) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास २२ जुलै पर्यंत वनकोठडी सुनावली आहे.
पवारवाडी पोलीस ठाणे हद्दीत पोलीस कर्मचारी रविवारी (दि. १८) मध्यरात्री गस्त घालत असताना मुंबई आग्रा महामार्गावर सवंदगाव फाटा येथे एक चारचाकी वाहन (एमएच ०१ व्हीए २६६३) संशयास्पद आढळून आले. पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहन अडवून तपासणी केली असता तात एक मयत मोर (नर) त्याची पिसे व एअर गन आढळून आली. पोलिसांनी संशयित आरोपी हुजेफा अब्दुल माजीद (३०, रा. सरदार नगर, नयापुरा) यासह मुद्देमाल ताब्यात घेतला.
पोलिसांनी घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी कांबळे यांना दिल्यानंतर ते वनपाल अतुल देवरे, वनरक्षक सुनील शिर्के, व्ही. एल. केंद्र, जे. डी. पावर्म, एकनाथ जाधव पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पथकाने आरोपी व मुद्देमाल ताब्यात घेतला असून आरोपी हुजेफा विरोधात वन्यजीव अधिनियम नुसार वनगुन्हा दाखल करीत त्यास अटक केली. आरोपी हुजेफ यास सोमवारी (दि. १९) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास २२ जुलै पर्यंत वनकोठडी सुनावली आहे. या प्रकरणी उपविभागीय अधिकारी जे. एन. येडलावार यांच्या सूचनेनुसार वनविभाग पुढील तपास करीत आहे.

About Shivshakti Times

Check Also

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत निवेदन- राहुल भाईजी पवार

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन- राहुल भाईजी पवार शिवशक्ती …

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार शिवशक्ती टाइम्स न्युज – (प्रतिनिधी युसूफ पठाण) यापुढे वाहतूक …

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन शिवशक्ती …

Leave a Reply

Your email address will not be published.