Breaking News

एका सेंकदात झाले होत्याचे नव्हते !!

अपघातातून बचावलेल्या सायने येथील सावंत यांनी सांगितली आपबिती

प्रतिनिधी
गुरुवारी दुपारी तिरूपती बालाजीच्या देवदर्शनाची आस घेऊन आम्ही मालेगावहून निघालो. कोणाच्याही मनात नव्हते की असे काही पडेन. पण रस्त्यावर थांबलेलो असतांना भरधाव वेगाने आलेल्या त्या वाहनाने एका सेंकदात होत्याचे नव्हते केले. पापणी लवते न लवते तोच सारे काही घडले. काही वेळापूर्वी आमच्यासोबत असलेले आमचे चारही मित्र गेले… अशा शब्दात या अपघातातून बचावलेल्या सायने येथील विनोद विठ्ठल सावंत यांनी अपघाताची आपबिती सांगितली.
मालेगाव शहर व परिसरातील १८ जण गुरुवारी (दि.२२) सायंकाळी तिरुपती बालाजी दर्शनासाठी निघालो होतो. बीड-उस्मानाबाद रस्त्यावर शुक्रवारी मध्यरात्री आमचे वाहन पंक्चर झाले. त्यामुळे आम्ही सर्व गाडीतून खाली उतरलो. काही जण निवांत रस्त्याच्या बाजूला थांबले होते. पण शरद, विलास, जगदीश आणि सतीश हे गाडीपुढे बसले होते. त्याचवेळी भरधाव वेगाने मागून आयशर ट्रक आला. आमच्यातील कोणीतरी ओरडलेही, की पळा ट्रक खूप वेगात येतोय. पण काही कळायच्या आता सगळे संपले होते. आमचे मित्र शरद देवरे, जगदीश दरेकर, सतीश सूर्यवंशी व विलास बच्छाव यांचा अपघातात मृत्यू होऊन ते आम्हाला सोडून गेले. स्वतःला सावरत जखमींना धीर देत आम्ही परत आलो. पण चार मित्र गमावल्याचे दुःख कायम मनात राहील.

About Shivshakti Times

Check Also

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत निवेदन- राहुल भाईजी पवार

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन- राहुल भाईजी पवार शिवशक्ती …

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार शिवशक्ती टाइम्स न्युज – (प्रतिनिधी युसूफ पठाण) यापुढे वाहतूक …

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन शिवशक्ती …

Leave a Reply

Your email address will not be published.