Breaking News

राष्ट्र सेवा दलाचे पूरग्रस्तांसाठी मदतीचे जाहीर नम्र आवाहन

राष्ट्र सेवा दलाचे पूरग्रस्तांसाठी मदतीचे जाहीर नम्र आवाहन

शिवशक्ती टाइम्स न्यूज

मालेगाव- सध्या धो धो पाऊस आणि कोसळणार्‍या दरडींमुळे महाराष्ट्रात गेल्या 3-4 दिवसांपासून मृत्युचे तांडव पाहावयास मिळत आहे. आता कुठे पावसाने काहीशी उसंत दिली आहे. चिखलमातीच्या ढिगार्‍याखाली अनेक जिती-जागती माणसे गाडली गेल्यामुळे नातलगांच्या आर्त किंकाळ्या काळीज चिरत आहेत. अजूनही काही बेपत्ता आहेत, त्यांच्या नातेवाईकांच्या काळजाचा ठोका ही चुकवत आहेत.
थोडक्यात पावसाचा आणि पूरस्थितीचा मोठा फटका महाराष्ट्रातील विशेषतः कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई उपनगरांना बसला आहे. या 10 जिल्ह्यातील साधारणपणे 900 गावे या जलतडाख्याने उध्वस्त झाली आहेत. यापैकी बहुतेक जिल्ह्यांमध्ये राष्ट्र सेवा दलाच्या मदतकार्याच्या तुकड्या रवाना झाल्या असून पुनर्वसन आणि मदतीसाठी कार्यकर्त्यांनी काम सुरू केलेले आहे.
या पत्रकाद्वारे आम्ही आपणास नम्र आवाहन करतो की, या पूरग्रस्तांना वस्तू तसेच रोख स्वरुपात मदत पोहचविणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी अन्नधान्य, ब्लॅंकेट, ताडपत्री, सतरंजी, वह्या-पुस्तके, स्वेटर्स, बॅग्स सोबतच चिखलातून चालण्यास गम बूट, रोख रक्कम जे शक्य होईल ते जमा करावे.
या मदत कार्याची व्याप्ती खूप मोठी असणार आहे. आपण शक्य ते अधिक आर्थिक सहकार्य या मानवतावादी कार्याला करावे, असे आवाहन मालेगाव जिल्हा कार्याध्यक्ष विलास वडगे, तालुका कार्याध्यक्ष सुधीर साळुंके यांनी केले आहे.

मदतीसाठी संपर्क:-

विलास वडगे- 94228 37507

रविराज सोनार- 9420233233

सारंग पाठक- 9860130447

राजेंद्र दिघे- 94216 00711

नचिकेत कोळपकर- 9921140729

राजीव वडगे- 98224 93259

स्वाती वाणी- 9370633060

कृपया आपली मदत वरील सेवा दल पदाधिका-यांकडे जमा करावी ही विनंती.

About Shivshakti Times

Check Also

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत निवेदन- राहुल भाईजी पवार

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन- राहुल भाईजी पवार शिवशक्ती …

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार शिवशक्ती टाइम्स न्युज – (प्रतिनिधी युसूफ पठाण) यापुढे वाहतूक …

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन शिवशक्ती …

Leave a Reply

Your email address will not be published.