Breaking News

राष्ट्र सेवा दला द्वारे लोकशाहीर आण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्ष समारोह संपन्न

राष्ट्र सेवा दला द्वारे लोकशाहीर आण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्ष समाप्ती समारोह संपन्न

शिवशक्ती टाइम्स न्यूज

मालेगाव- सन २०२० मध्ये राष्ट्र सेवा दलाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्याचे जाहीर केले होते. आणि २०२१ ची दिनदर्शिकाही आण्णा भाऊ साठे यांच्यावर आधारित काढली होती.
संपूर्ण राज्यभर आपण मोठ्या संख्येने ही दिनदर्शिका लोकांपर्यंत पोहोचवली.
१ ऑगष्ट २०२१ रोजी या जन्मशताब्दी वर्षाची समाप्ती करण्यात आली. लोकमान्य टिळक स्मृतिदिन आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्ताने अभिवादन करून मालेगाव शहर व तालुका परिसरातील ५३ ग्रंथालयांना अण्णाभाऊ साठे यांचे चित्र व विचार असलेले राष्ट्र सेवा दलाचे पोस्टर जेष्ठ सेवा दल सैनिक मार्गदर्शक प्रदीप कापडिया आणि नाशिक विभागीय ग्रंथालय महासंघाचे कार्याध्यक्ष ग्रंथमित्र अजय शाह यांचे हस्ते भेट देण्यात आले.
या प्रसंगी जिल्हा संघटक रविराज सोनार, तालुका संघटक सारंग पाठक, राज्यमंडल सदस्य नचिकेत कोळपकर, राजीव वडगे, काकाणी वाचनालयाचे कार्यवाह मिलिंद गवांदे, ग्रंथपाल अजय जोशी, संजय जगताप, आप्पा जगताप यांचेसह तसेच ५३ वाचनालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

About Shivshakti Times

Check Also

‼️ वाहतूक पोलिसांची कोर्टाने केली कानउघाडणी‼️

‼️ वाहतूक पोलिसांची कोर्टाने केली कानउघाडणी‼️ चलन अथवा दंडाची रक्कम जागीच भरण्याबाबत जबरदस्ती करू नये,” …

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ओझर विमानतळावर स्वागत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ओझर विमानतळावर स्वागत शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी -युसूफ पठाण मुख्यमंत्री उद्धव …

मालेगावात अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणारे गुन्हेगार जेरबंद

मालेगावात अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणारे गुन्हेगार जेरबंद तीन देशी बनावटीचे पिस्टल व सात जिवंत काडतुसे हस्तगत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *