Breaking News

खूशखबर! अर्थव्यवस्था सावरली, जुलैमध्ये ‘जीएसटी’मधून मिळाला रेकॉर्डब्रेक महसूल

नवी दिल्ली : करोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता आता कमी झाली असून जुलै महिन्यात जीएसटी महसुलात प्रचंड वाढ झाली आहे. जुलै महिन्यात जीएसटीमधून १,१६,३९३ कोटींचा विक्रमी महसूल मिळाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत कर संकलनात ३३ टक्के वाढ झाली आहे. या आकडेवारीने केंद्र सरकारला दिलासा मिळाला आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेचे अचानक संकट उभं राहिल्याने अनेक राज्यांनी मे आणि जून महिन्यात लॉकडाउन लागू केला होता. त्याचा परिणाम कर संकलनावर दिसून आला. जून महिन्यात जीएसटीतून सरकारला ९२,८४९ कोटींचा महसूल मिळाला होता. मे महिन्यापाठोपाठ जूनमध्ये कर महसूल कमी झाल्याने सरकारची चिंता वाढली होती. मे महिन्यात १.०२ लाख कोटींचा कर मिळाला होता.

‘SBI’ चा मॉन्सून धमाका ; कर्जदारांसाठी घेतला हा मोठा निर्णय, होणार असा फायदा
अर्थ मंत्रालयाने आज रविवारी जीएसटीची आकडेवारी जाहीर केली. जुलै महिन्यात जीएसटीमधून १,१६,३९३ कोटींचा महसूल मिळाला आहे. यात सीजीएसटी २२,१९७ कोटी, एसजीएसटी २८,५४१ कोटी आणि आयजीएसटी ५७,८६४ कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवर वसूली झालेल्या २७,९०० कोटी रुपयांसह) आणि उपकर ७९१० कोटी रुपये (वस्तुंच्या आयातीवर वसूली झालेल्या ८१५ कोटी रुपयांसह) यांचा समावेश आहे.

केंद्र सरकारची संसदेत कबुली! होय…जुलैमध्ये खाद्य तेलाच्या दरात झाली प्रचंड वाढ
जीएसटी महसूल सलग आठ महीने एक लाख कोटी रुपयांवर राहिला होता. जून २०२१ मध्ये तो १ लाख कोटी रुपयांच्या खाली आला. मे २०२१ दरम्यान बहुतांश राज्ये/केंद्र शासित प्रदेश कोविडमुळे पूर्ण किंवा अंशत: बंद होते. मे २०२१ महीन्यातील ई-वे बिल डेटा पाहिला असता एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात ई-वे बिल ३० टक्क्याहून कमी आहेत. त्याचा फटका जीएसटी संकलनाला बसला असल्याचे सरकारनं म्हटलं आहे.

About Shivshakti Times

Check Also

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत निवेदन- राहुल भाईजी पवार

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन- राहुल भाईजी पवार शिवशक्ती …

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार शिवशक्ती टाइम्स न्युज – (प्रतिनिधी युसूफ पठाण) यापुढे वाहतूक …

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन शिवशक्ती …

Leave a Reply

Your email address will not be published.