Breaking News

मालेगावात अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणारे गुन्हेगार जेरबंद

मालेगावात अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणारे गुन्हेगार जेरबंद
तीन देशी बनावटीचे पिस्टल व सात जिवंत काडतुसे हस्तगत

शिवशक्ती टाइम्स न्यूज

प्रतिनिधी -युसूफ पठाण

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावे तसेच अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन व्हावे यासाठी पोलीस अधीक्षक सचिन पाटील साहेब यांच्या आदेशान्वये पोलीस ठाणे निहाय कारवाई सुरू आहे.

त्यानुसार मालेगाव शहरातील पोलीस पथकांनी दिनांक 3 ऑगस्ट 2021 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास नयापुरा व नूरबाग परिसरात छापा टाकून अवैधरित्या घातक अग्निशस्त्र बाळगणारे इसमांना ताब्यात घेतले सदर कारवाईत १) हाफिजूर रहमान मो. इद्रीस रा. नयापुरा मालेगाव 2) इम्रान खान आताऊल्ला खान उर्फ इम्रान शेट्टी रा. दातार नगर मालेगाव ३) शहजाद अख्तर मो. सिद्दीकी रा. हजार खोली मालेगाव ४) अब्दुल रहमान शेख हसन रा. कमाल पुरा मालेगाव ५) अझरुद्दीन गयासुद्दीन सय्यद रा. आयेशा नगर मालेगाव यांचे ताब्यातून तीन देशी बनावटीचे पिस्टल (गावठी कट्टे) व सात जिवंत काडतुसे असे घातक शस्त्र हस्तगत करण्यात आले सदर इसमाविरुद्ध अवैधरित्या घातक अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी मालेगाव आजाद नगर व आयेशा नगर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 3/25, सह भादवि 353, 120 ब 34 प्रमाणे एकूण दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिस पथक पुढील तपास करीत आहे

नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे

मालेगाव शहर पोलिस पथकातील सपोनि काळे व पोलीस हवा. पवार, पोलीस नाईक उबाळे, पो. कॉ. अहिरे यांनी सदरची कारवाई केली आहे

About Shivshakti Times

Check Also

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत निवेदन- राहुल भाईजी पवार

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन- राहुल भाईजी पवार शिवशक्ती …

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार शिवशक्ती टाइम्स न्युज – (प्रतिनिधी युसूफ पठाण) यापुढे वाहतूक …

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन शिवशक्ती …

Leave a Reply

Your email address will not be published.