Breaking News

मालेगावी १० तलवारींसह चौघे ताब्यात

शहर पोलिस उपअधीक्षक यांच्या विशेष पथकाची कारवाई

शिवशक्ती टाइम्स न्यूज

मालेगाव : प्रतिनिधी
शहरातील रमजानपुरा भागातील आमिन मौलाना दर्ग्याच्या मागे विना परवाना बेकायदेशीररित्या विक्रीच्या उद्देशाने च्या १३ हजार रुपये किमतीच्या १० धारदार तलवारी स्वतःच्या कब्जात बाळगणाऱ्या चौघांना येथील पोलिस उपअधीक्षक शहर लता दोंदे यांच्या विशेष पथकाने अटक केली.
पोलीस अधिक्षक सचिन पाटील व अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील पोलीस हवालदार दिनेश पवार, पोलीस नाईक राकेश उबाळे, साजीद शेख, पोलीस शिपाई तुषार आहिरे, सचिन बेदाडे यांनी मंगळवारी (दि. १०) रोजी रात्री ८.४५ वाजेच्या सुमारास केलेल्या छापा कारवाईत अबु तालीब मोहम्मद कुर्बान (२२, रा. रमजानपुरा कुलसुम मशीद युसुफी मेडीकल समोर), मोहम्मंद साजीद युनुस खान (२०, रा. जेबुन्निसा मशीद समोर रमजानपुरा), अन्सारी रिहान अहमद रियाजउद्दीन (१९, रा. हानीफ नगर जैबुन्निसा मशीद जवळ) व अब्दुल मुक्तार अब्दुल सत्तार (२५, रा.) रमजानपुरा रोलेक्स सायजींग समोरील गल्लीत) सर्व राहणार मालेगाव यांना ताब्यात घेतले. त्यांच्या कब्जातून १३ हजार रुपये किमतीच्या १० धारदार तलवारी विक्री करण्याच्या उद्देशाने मिळुन आल्यात. याप्रकरणी रमजानपुरा पोलीस ठाण्यात पोलिस शिपाई तुषार अहिरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Shivshakti Times

Check Also

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ओझर विमानतळावर स्वागत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ओझर विमानतळावर स्वागत शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी -युसूफ पठाण मुख्यमंत्री उद्धव …

मालेगावात अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणारे गुन्हेगार जेरबंद

मालेगावात अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणारे गुन्हेगार जेरबंद तीन देशी बनावटीचे पिस्टल व सात जिवंत काडतुसे हस्तगत …

1,10,000 ची लाचघेणारा हवालदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात;

पुणे ग्रामीण पोलिस दलात प्रचंड खळबळ शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी – युसूफ पठाण पुणे : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *