Breaking News

चिपळूण व महाड येथील पूरग्रस्तांना मालेगाव जिल्हा नाशिक येथील शहीद भगतसिंग सेनेतर्फे मदत.

चिपळूण व महाड येथील पूरग्रस्तांना मालेगाव जिल्हा नाशिक येथील शहीद भगतसिंग सेनेतर्फे मदत.

प्रतिनिधी – मालेगाव

चिपळूण महाड संपूर्ण कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. या परिस्थितीत पूरग्रस्तांना तातडीने मदतीची गरज होती, ही गरज ओळखून मालेगाव येथील शहीद भगतसिंग सेनेतर्फे तातडीने मदत गोळा करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. जमा झालेल्या मदतीचे योग्य रीतीने किट्स तयार करून या मदत किट्स चे चिपळूण महाड येथील पूरग्रस्त बांधवाना योग्य रीतीने मदत पोहोच केली. २०१९ वर्षी कोल्हापूर सांगली येथील महापुरात देखील शहीद भगतसिंग सेनेतर्फे अश्याच प्रकारची मदत करण्यात आली होती. यावेळी शहिद भगतसिंह सेनेचे अध्यक्ष ललित बेडेकर, आंशुराज राजेंद्र पाटिल,सुरज कांबळे , यश रणधिरे, आकाश कांबळे , सुशिल कांबळे ,प्रविण बेडेकर ,रुषिकेश सोनवणे, आमोल खैरणार , विनोद पगार, पवन याळीज, पुस्कर शिंदे ,सागर याळीज , आदिसह उपस्थित होते
अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम नियमितपणे पार पाडण्याचा शहीद भगतसिंग सेनेचा मानस आहे

शाहिद भगतसिंग सेना मालेगाव यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून इतर सामाजिक संघटनेने सुद्धा असे सामाजिक उपक्रम हाती घ्यावे – हि विनंती
🇮🇳शहीद भगतसिंह सेना मालेगांव🇮🇳

About Shivshakti Times

Check Also

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ओझर विमानतळावर स्वागत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ओझर विमानतळावर स्वागत शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी -युसूफ पठाण मुख्यमंत्री उद्धव …

मालेगावात अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणारे गुन्हेगार जेरबंद

मालेगावात अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणारे गुन्हेगार जेरबंद तीन देशी बनावटीचे पिस्टल व सात जिवंत काडतुसे हस्तगत …

1,10,000 ची लाचघेणारा हवालदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात;

पुणे ग्रामीण पोलिस दलात प्रचंड खळबळ शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी – युसूफ पठाण पुणे : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *