Breaking News

श्री पेंढारी सेवाभावी संस्थाच्या वतीने 10 व 12 वी च्या विद्यार्थांचा गुण गौरव सोहळा

श्री पेंढारी सेवाभावी संस्था, मालेगाव कँम्प च्या वतीने 10 व 12 वी च्या विद्यार्थांचा गुण गौरव सोहळा

शिवशक्ती टाइम्स न्यूज – आनंद दाभाडे

मालेगाव – प्रतिनिधी

श्री पेंढारी सेवाभावी संस्था मालेगाव कँम्प यांचे वतीने दि 15 ऑगस्ट 2021 रोजी सायं 7:00 वा इयत्ता 10 वी व 12 वी च्या विद्यार्थांचा गुण गौरव सोहळा आयोजित करण्यात आला.
श्री छत्रपति शिवाजी महाराज वाडी,मालेगाव कँम्प येथील इयत्ता 10 वी च्या 16 व 12 वी च्या 15 विद्यार्थांना प्रमाणपत्र, वही, पेन, पुस्तके देऊन गुणगौरव करण्यात आला
कार्यक्रमात प्रमुख अतिथि म्हणुन म स गा महाविद्यालयचे प्राध्यापक देवेंद्र बी. सोनवणे व आर बी एच कन्याविद्यालयाचे संगीत शिक्षक श्री. शंकर एम महाजन सर उपस्थिति होते
प्रमुख पाहुण्यांचा सत्कार पेंढारी समाज अध्यक्ष श्री. पांडुरंग गणपत लांडगे व संस्था अध्यक्ष श्री.शाम राघो बेडेकर यांनी केले. कार्यक्रमाचे इशस्तवन व स्वागतगीत श्री महाजन एस. एम व सौ.प्रतिभा एस महाजन यांनी सादर केले
कार्यक्रमात उपस्थिति असलेले पेंढारी समाज अध्यक्ष श्री पांडुरंग लांडगे तसेच पेंढारी समाज माजी अध्यक्ष श्री कृष्णा बनसोडे, श्री गोकुळ बेडेकर, श्री नितीन शेलार, श्री भारत लाडके, श्री योगेश खांडेकर यांचा सत्कार संस्थेच्या पदाधिकारी श्री पेंढारी सेवा भावी संस्थेचे (अध्यक्ष)श्री श्याम राघो बेडेकर ,(उपाध्यक्ष) राकेश देवरे, (सचिव) प्रमोद बेडेकर, (उपसचिव) चंद्रकांत अभंगे, (खजिनदार) लखन उपाडे, (उपखजिनदार) मंगेश वानखेडे, (सभासद)संजय वानखेडे, रावसाहेब लाडके,अनिल रणसिंह,किशोर रणधीर,सूर्यकांत बनसोडे,सुरज लाडके,रोहित शेलार,अनिल तुपे,धनंजय अभंगे,अंकुश सरनाईक,(सल्लागार)पांडुरंग लांडगे,कृष्णा बनसोडे,गोकुळ बेडेकर,नितीन शेलार,भारत लाडके यांच्या हस्ते करण्यात आला
प्रमुख अतिथिंच्या मार्गदर्शनपर भाषणात शिकुन देशाचे चांगले व आदर्श नागरीक बना तसेच काबाड कष्ट करणार्या आई वडीलांचे नाव लौकिक करा.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेेचे अध्यक्ष श्री शाम बेडेकर व सुत्रसंचालन श्री प्रमोद बेडेकर यांनी केले
कार्यक्रमास पेंढारी समाजाचे समाज बांधव ,भगिनी व विद्यार्थी उपस्थित होते

About Shivshakti Times

Check Also

माळमाथ्यावरील रस्त्याची दुरावस्था ग्रामस्थांनी केले खडयात वृक्षरोपण

मालेगाव : प्रतिनिधी  माळमाथ्यावरील गिगाव, रोंझाने, सिताने, खलाने, बोधे, माल्हणगाव या गावातील रस्त्यांची जीवघेणी दुरावस्था …

कृषिरत्न फाउंडेशनतर्फे आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांसाठी बी-बियाणे, खते व साडीचोळी कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांच्या हस्ते वाटप

सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील कृषिरत्न फाउंडेशनने कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या अनाथ कुटुंबांना तसेच आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांसाठी …

राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केलेल्या मागणीला यश

राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केलेल्या मागणीला यश केंद्र सरकारने दिला खत सबसिडी वाढविण्याचा निर्णय …

Leave a Reply

Your email address will not be published.