Breaking News

आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नांने नगरविकास मंत्र्यांची नांदगाव ला भरघोस मदत

आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नांने नगरविकास मंत्र्यांची नांदगाव ला भरघोस मदत

शिवशक्ती टाइम्स न्यूज –
प्रतिनिधी युसूफ पठाण

आमदार सुहास कांदे यांनी नांदगाव पूरग्रस्त नदीचे खोलीकरण,संरक्षक भिंत व इतर कामासाठी 7 कोटीचा निधी उपलब्ध करून देण्याचे निवेदन नगरविकासमंत्री ना.एकनाथ शिंदे यांना सादर केले.नांदगाव येथील अतिवृष्टी मुळे झालेले अतोनात नुकसान पाहता ठोस उपाययोजना करण्यासाठी आमदार सुहास आण्णा कांदे सतत प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहेत,या धर्तीवर नदी चे खोलीकरण करणे,संरक्षक भिंत बांधणे,आणि विवेक हॉस्पिटल ते स्मशान भूमी वाहून गेलेला पुल बांधणे कामी नगर परिषदेला लागणारा मोठा निधी उपलब्ध करून देण्यासाठी चे निवेदन मंगळवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना दिले.नांदगाव शहराचे झालेले अतोनात नुकास व्हिडिओ आणि छायाचित्रांच्या माध्यमातून आमदार सुहास आण्णा कांदे यांनी ना.एकनाथ शिंदे यांना परिस्थिती दाखवली.या उद्देशाने भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा शहरावर येऊ नये म्हणून या उपाययोजना करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी लागणारा हा निधी होईल तितक्या लवकर उपलब्ध करून देण्याची कळकळीची विनंती नगरविकास खात्याचे मंत्री नामदार एकनाथ शिंदे यांना केली.
या प्रसंगी नामदार एकनाथ शिंदे साहेबांनी प्रतिसाद देत निधी उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मकता दाखवली आहे. आमदार सुहास कांदे अतिवृष्टी झाल्याच्या दिवसापासून पूरग्रस्त नागरिक आणि व्यापाऱ्यांच्या मदतीसाठी धाऊन आलेले आहेत,गोर गरीब नुकसान ग्रस्थांसाठी जेवण,अन्न,धान्य,गृह उपयोगी वस्तू,गॅस,कपडे ब्लँकेट वाटून त्यांनी जनतेला धीर दिला आहे,रोज मदत वाटप चालूच आहे, स्वतः चा पदरमोड करून तर सोबत विविध मार्गाने मदत आणि निधी उपलब्ध करत करून देत आहेत,संकट काळात आपला कुटुंबप्रमुख आपल्यासाठी धावून आल्याचा आनंद आपत्तीग्रस्तांच्या चेहऱ्यावर साफ दिसत आहेत.
ना. एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्यातून निधी उपलब्ध झाल्यावर त्वरित काम सुरू करण्यात येईल असे आमदार सुहास कांदे यांनी सांगितले.

About Shivshakti Times

Check Also

श्री सप्तशृंगी मातेचे मंदिर संपूर्ण जिर्णोद्धारासह तर गर्भगृह चांदीच्या नव्या नक्षकांत रूपाने झळकणार…!

श्री सप्तशृंगी मातेचे मंदिर संपूर्ण जिर्णोद्धारासह तर गर्भगृह चांदीच्या नव्या नक्षकांत रूपाने झळकणार…! भाविकांनी सढळ …

महाराष्ट्रातील 72 न्यूज पोर्टलच्या स्वनियमन संस्थेला केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याकडून मान्यता

महाराष्ट्रातील 72 न्यूज पोर्टलच्या स्वनियमन संस्थेला केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याकडून मान्यता (संपादक – जयेश …

मालेगावी श्रीराम नवमी शोभायात्रा मिरवणुक जल्लोशात संपन्न

मालेगावी श्रीराम नवमी शोभायात्रा मिरवणुक जल्लोशात संपन्न शिवशक्ती टाइम्स काल दि. 10 एप्रिल रोजी चैत्र …

Leave a Reply

Your email address will not be published.