Breaking News

राष्ट्रीय जनगणनेत ओबीसींची जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे

राष्ट्रीय जनगणनेत ओबीसींची जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे- वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

शिवशक्ती टाइम्स न्यूज

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ओबीसींची जनगणना करण्यात आलेली नाही. गेली 70 वर्षे ओबीसींच्या संघटना राष्ट्रीय जनगणनेत ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेची मागणी करीत असून सरकार या मागणीकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत आहे. राष्ट्रीय जनगणनेत ओबीसींची जातनिहाय जनगणना केली पाहिजे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी तर्फे अपर जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
सदर मागणीबाबत संपूर्ण महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन करेल असा इशारा सदर निवेदनाद्वारे देण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष कपिल आहिरे यांच्या सोबत ता.अध्यक्ष सुनील अहिरे, ता.महासचिव शशीकांत पवार,जिल्हा सचिव प्रा. राजेन्द्र पवारसर, ता.कोषाध्यक्ष सिद्धार्थ उशिरे,जिल्हा प्र.प्रमुख मुकेश खैरनार,जिल्हा सदस्य राजू धिवरे,कैलास लोहार,आकाश सुरवाडे,कुणाल अहिरे,संतोष बोराळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

About Shivshakti Times

Check Also

श्री सप्तशृंगी मातेचे मंदिर संपूर्ण जिर्णोद्धारासह तर गर्भगृह चांदीच्या नव्या नक्षकांत रूपाने झळकणार…!

श्री सप्तशृंगी मातेचे मंदिर संपूर्ण जिर्णोद्धारासह तर गर्भगृह चांदीच्या नव्या नक्षकांत रूपाने झळकणार…! भाविकांनी सढळ …

महाराष्ट्रातील 72 न्यूज पोर्टलच्या स्वनियमन संस्थेला केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याकडून मान्यता

महाराष्ट्रातील 72 न्यूज पोर्टलच्या स्वनियमन संस्थेला केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याकडून मान्यता (संपादक – जयेश …

मालेगावी श्रीराम नवमी शोभायात्रा मिरवणुक जल्लोशात संपन्न

मालेगावी श्रीराम नवमी शोभायात्रा मिरवणुक जल्लोशात संपन्न शिवशक्ती टाइम्स काल दि. 10 एप्रिल रोजी चैत्र …

Leave a Reply

Your email address will not be published.