Breaking News

पंधरा हजाराची लाच मागणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासन अधिकाऱ्याला अटक ; अँटी करप्शनची बुधवारी कारवाई

पंधरा हजाराची लाच मागणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासन अधिकाऱ्याला अटक ; अँटी करप्शनची बुधवारी कारवाई

शिवशक्ती टाइम्स न्युज –   प्रतिनिधी – युसूफ पठाण

सोलापूर :(प्रतिनिधी):-
*मुख्याध्यापकाकडे पद स्थापनेचा प्रस्ताव सादर करण्यासाठी पंधरा हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या जिल्हा परिषदेतील कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.

सुहास अण्णाराव चेळेकर असे अँटिकरप्शनने अटक करण्यात आलेल्या कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्याचे नाव आहे.
दुपारी साडेबाराच्या सुमारास ही कारवाई झाली.

यातील तक्रारदार यांनी राज्यसरकारच्या पती-पत्नी एकत्रीकरण योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करणेकरीता यातील आरोपी लोकसेवक यांनी २५ हजार रुपये लाचेची मागणी करीत असलेबाबत अॅन्टी करप्शन ब्युरो, सोलापूरकडे तक्रार दिली होती.
तक्रारदार यांनी जवळच्या रिक्त शाळेत मुख्याध्यापक पदी बदली होणेकरीता अर्ज दिला होता.
सदर अर्जावर मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडे ०८.०९.२०२१ रोजी तक्रार प्राप्त झाली होती.
सदर तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता यातील आरोपीने, तडजोडी अंती १५,००० रु. लाच मागणी केली आहे.
याची शहानिशा झाल्यानंतर बुधवारी अँटी करप्शन विभागाच्या पथकाने या प्रकरणात आरोपी लोकसेवक सुहास चेळेकर यांना अटक केली आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये केवळ तीन दिवसात ही अँटी करप्शन ची दुसरी कारवाई आहे. समाज कल्याण विभागातील कक्ष अधिकाऱ्याला तीस हजाराची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते
या घटनेमुळे पुन्हा जिल्हा परिषदेमध्ये एकच खळबळ उडाली.

ही कारवाई संजीव पाटील,
सहा. पोलीस आयुक्त ला.प्र.वि, सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. चंद्रकांत कोळी,
पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि., सोलापूर,पोलीस अंमलदार पो.ना. प्रमोद पकाले, पो.ना.अतुल घाडगे, पौ.कों.गजानन किणगी, चा.पो.कों./शाम सुरवसे,
सर्व नेमणुक ला.प्र.वि., सोलापूर. यांनी पार पाडली.

About Shivshakti Times

Check Also

श्री सप्तशृंगी मातेचे मंदिर संपूर्ण जिर्णोद्धारासह तर गर्भगृह चांदीच्या नव्या नक्षकांत रूपाने झळकणार…!

श्री सप्तशृंगी मातेचे मंदिर संपूर्ण जिर्णोद्धारासह तर गर्भगृह चांदीच्या नव्या नक्षकांत रूपाने झळकणार…! भाविकांनी सढळ …

महाराष्ट्रातील 72 न्यूज पोर्टलच्या स्वनियमन संस्थेला केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याकडून मान्यता

महाराष्ट्रातील 72 न्यूज पोर्टलच्या स्वनियमन संस्थेला केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याकडून मान्यता (संपादक – जयेश …

मालेगावी श्रीराम नवमी शोभायात्रा मिरवणुक जल्लोशात संपन्न

मालेगावी श्रीराम नवमी शोभायात्रा मिरवणुक जल्लोशात संपन्न शिवशक्ती टाइम्स काल दि. 10 एप्रिल रोजी चैत्र …

Leave a Reply

Your email address will not be published.