Breaking News

भाजप जिल्हा व शहराच्या वतीने एस टी महामंडळ कर्मचारी आंदोलनाला पाठींबा

भाजप जिल्हा व शहराच्या वतीने एस टी महामंडळ कर्मचारी आंदोलनाला पाठींबा

दाभाडी : प्रतिनिधी
गेल्या १४ दिवसापासून सुरू असलेल्या एस टी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला येथील भाजप जिल्हा व शहराच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. राज्यभर चालू असलेल्या आंदोलनात भाजपाने उडी घेतली असून त्याच अनुषंगाने गुरूवारी (दि. ११) मालेगाव येथील आगारात बसलेल्या कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी डॉ. अद्वय हिरे यांच्यासह मालेगाव जिल्हा व शहर सहभागी झाले होते. तर दुसरीकडे सरकारच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी मुंडन केले.
राज्य सरकार एस टी कर्मचाऱ्यांवर करत असलेला अन्याय त्वरित थांबवावा. तुटपुंज्या मानधनात देखील एस टी कर्मचारी काम करीत आहेत. कोरोना काळात नागरिकांना सोडविण्याचे काम या कर्मचाऱ्यांनी प्रामाणिक पणे केले आहे. संकट काळी आपले कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचारी वर्गाला सरकार वेठीस धरत आहे. भाजप नेहमीच अन्यायाच्या विरोधात चाललेल्या लढ्यात आपल्या पाठीशी असल्याचे आश्वासन डॉ. हिरे यांनी दिले. जिल्हा उपाध्यक्ष हरिप्रसाद गुप्ता, जिल्हा संघटन सरचिटणीस देवा पाटील यांची भाषणे झाले. यावेळी पाठिंब्याचे पत्र देखील भाजपा तर्फे आंदोलकांना देण्यात आले.
राज्यभर ३५ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली त्यांच्या आत्म्यास शांती मिळावी व राज्य सरकारच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी मुंडन केले. यावेळी शहराध्यक्ष मदन गायकवाड, शहर संघटन सरचिटणीस जयप्रकाश पठाडे, राजेंद्र शेलार, जयसिंग परदेशी, एससी आघाडी जिल्हाध्यक्ष योगेश पाथरे, विजय एथाल, सांस्कृतिक आघाडी जिल्हाध्यक्ष सतीश उपाध्ये, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस कुणाल सूर्यवंशी, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष कमलेश सोनवणे, श्याम गांगुर्डे, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष स्वप्नील भदाणे, कमलेश अहिरे, दर्शन पवार व मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते तसेच कर्मचारी उपस्थित होते.

About Shivshakti Times

Check Also

मालेगावात ओपन कराटे स्पर्धा २०२१-२२ चे आयोजन

मालेगावात ओपन कराटे स्पर्धा २०२१-२२ चे आयोजन संपादक – जयेश दाभाडे     उपसंपादक-आनंद दाभाडे मालेगाव …

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्यासाठी प्रयत्न करणार -राज्यमंत्री अब्दुल सत्तार

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्यासाठी प्रयत्न करणार -राज्यमंत्री अब्दुल सत्तार • तिर्थक्षेत्राच्या विकासकामांचाही घेतला आढावा …

सोलापूर ग्रामीण एल.सी.बी.ची धडाकेबाज कामगिरी

वडाळा येथील डॉक्टरांना खंडणीच्या उददेषाने अपहरण करून लुटलेल्या ०७ आंतरजिल्हा दरोडेखोरांच्या ०४ दिवसात मुसक्या आवळण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *