Breaking News

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार

शिवशक्ती टाइम्स न्युज – (प्रतिनिधी युसूफ पठाण)

यापुढे वाहतूक नियमांची अंमलबजावणी न करणे वाहनचालकांना चांगलेच महागात पडणार आहे. सांगली जिल्हा वाहतूक पोलिसांनी शासन निर्णया- नुसार सुधारित दंड ११ डिसेंबर २०१९ पासून आकारणी लागू केली असून विनालायसन वाहन चालविणाऱ्यांना आता ५०० रूपयांऐवजी
थेट ५ हजारांचा दंड भरावा लागणार आहे.

नव्या दंड आकारणीनुसार आता नियमभंगासाठी किमान दंडाची रक्कम २०० ऐवजी थेट ५०० रूपयांवर पोहचली आहे. अहमदनगर पोलीस दलाच्या वाहतूक शाखेने शासनाच्या मोटार वाहन (सुधारित) अधिनियम २०१९ नुसार दंड आकारणीस शनिवारी ११ डिसेंबर

२०२१ पासून सुरूवात केली आहे. ई-चलान पद्धतीने ही दंड आकारणी होणार आहे. लायसनशिवाय वाहन चालविणे आता अतिमहागात पडणार आहे. यासाठी आधी ५०० रुपये दंड आकारला जात होता. आता थेट ५ हजार रूपये दंड होणार आहे. या प्रकारणात न्यायालयात खटला दाखल करण्याचीही तरतूद आहे.
वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार
लायसनशिवाय वाहन चालविताना दुसऱ्यांदा किंवा पुन्हा, पुन्हा सापडल्यास दंडासोबत ३ महिन्यांसाठी लायसन अवैध ठरविले जाणार आहे. नव्या नियमानुसार दंडाची सर्वाधिक वाढ लायसनशिवाय वाहन चालवून नियम मोडणाऱ्यांसाठी झाली आहे. अशी असेल दंड आकारणी लायसनशिवाय वाहन चालविणे- ५ हजार बोर्डशिवाय वाहन चालविले ५०० आणि पुन्हा नियम मोडल्यास १५००.
विना हेल्मेट- ५०० रूपये आणि दुसऱ्यांदा हा नियम मोडल्यास ३ महिन्यासाठी लायसन अवैध वाहन चालवताना मोबाईलचा वापर- ५०० रूपये, पुन्हा नियम मोडणाऱ्यांना १५००. सिट बेल्ट न वापरणाऱ्यांना ५०० रुपये आणि नियमाचे पुन्हा उल्लंघन केल्यास १५०० रूपये. ट्रिपल सिटसाठी १ हजार रुपये दंड आणि पुन्हा ट्रिपल सिट सापडल्यास ३ महिने लायसन अवैध ठरविले जाणार आहे. राँगसाईड ट्रिपल सिटसाठी १ हजार रुपये दंड आणि पुन्हा ट्रिपल सिट सापडल्यास ३ महिने लायसन अवैध ठरविले जाणार आहे.

रॉगसाईड वाहन चालविणे थेट न्यायालयात खटला दाखल केला जाणार आहे.
कर्णकर्कश हॉर्न-१ हजार रूपये आणि पुन्हा हॉर्न वाजविल्यास २ हजार रूपये. पोलीसांच्या इशाऱ्याचे पालन न करणे- ५०० रुपये आणि पुन्हा तिच चूक केली तर १५०० रूपये काचांना ब्लॅक फिल्म लावल्यास ५०० रूपये – आणि पहिल्या दंडातरही काळी फिल्म कायम ठेवल्यास पुन्हा १५०० रूपये. मादक द्रव्याचे सेवन करून वाहन चालविणाऱ्यांना थेट न्यायालयात खटला चालविला जाणार आहे.
सांगली जिल्हयातील सर्व वाहनधारकांना आवहान करण्यात येते की. महाराष्ट्र शासनाने मोटार वाहन (सुधारणा) अधिनीयम २०१९ ची अमलबजावणी करण्याबाबत अधिसुचना काढली असुन या अधिसुचनेची सदर अधिनियमानुसार ई चलन प्रणालीमध्ये दंड रक्कम ही दिनांक ११/१२/२०२१, रोजी मध्यरात्रीपासुन अदयावत करण्यात आली आहे.
तरी वाहनधारकांनी वाहन चालविताना आपले कडुन मोटार वाहनाचे कायदयाचे उल्लंघन होणार नाही याची
दक्षता घेवुन मोटार वाहन कायदयाचे सर्व नियम पाळुनच आपले वाहन चालविण्याचे आहे.
अन्यथा खालील प्रमाणे उल्लंघन करणारे वाहन धारक यांना नविन जादा दराने दंड आकारणी भरावी लागेल अथवा काही प्रकारात मा. न्यायालयात खटले दाखल होतील. वरील दंडात्मक कारवाई टाळणे करीता वाहन धारकांनी सर्व नियमांचे तंतोतंत पालन करण्याबाबत जिल्हा वाहतुक नियंत्रण शाखा. सांगली च्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

About Shivshakti Times

Check Also

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत निवेदन- राहुल भाईजी पवार

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन- राहुल भाईजी पवार शिवशक्ती …

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन शिवशक्ती …

दोन तरुणींचा दुचाकी-अँपे रिक्षाचा अपघात- एक विद्यार्थीनी ठार तर एक गंभीर जखमी

मालेगांवतील कॉलेजस्टॉप येथे दोन तरुणींचा दुचाकी-अँपे रिक्षाचा अपघात एक विद्यार्थीनी ठार तर एक गंभीर जखमी …

Leave a Reply

Your email address will not be published.