Breaking News

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत निवेदन- राहुल भाईजी पवार

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन- राहुल भाईजी पवार

शिवशक्ती टाइम्स न्युज

मालेगाव (प्रतिनिधी) –  संभाजी भिडे यांच्या मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत राष्ट्रवादी युवक कांग्रेस राहुल पवार यांच्याकडून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले भीमा कोरेगाव दंगलीतील मुख्य आरोपी संभाजी भिडे हे मालेगाव व तालुक्यात दि.२ जानेवारी २०२२ रोजी कार्यक्रमास येणार आहे अशी माहिती मिळाली असताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हा सरचिटणीस राहुल भाईजी पवार यांनी भिडे यांचा मालेगाव तालुक्यात व शहरात होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्यात यावी याबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी तहसीलदार व अप्पर पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले.

संभाजी भिडे यांनी भीमा कोरेगाव येथे जातीवाचक भाषण देऊन जातीय दंगल भडकवली आहे त्यामुळे मालेगाव शहरही संवेदनशील शहर आहे संभाजी भिडे यांनी मालेगाव शहरात कार्यक्रम घेण्यास त्यातून जातीवादी भाषण दिल्यास त्यातून जातीय दंगल होण्याची शक्यता आहे त्यामुळे मालेगाव शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो त्यामुळे संभाजी भिडे यांच्या २ जानेवारी ला होणाऱ्या कार्यक्रमाना परवानगी नाकारण्यात यावी अशा आशयाचे निवेदन राहुल भाईजी पवार यांनी दिले त्यावेळी गौतम बागुल विजय बागुल कैलास मोहिते किरण मोरे राहुल धिवरे संजय निकम अनिकेत जगताप हर्षवर्धन आहिरे बाळा पठाडे प्रकाश चव्हाण उपस्थित होते.

About Shivshakti Times

Check Also

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार शिवशक्ती टाइम्स न्युज – (प्रतिनिधी युसूफ पठाण) यापुढे वाहतूक …

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन शिवशक्ती …

दोन तरुणींचा दुचाकी-अँपे रिक्षाचा अपघात- एक विद्यार्थीनी ठार तर एक गंभीर जखमी

मालेगांवतील कॉलेजस्टॉप येथे दोन तरुणींचा दुचाकी-अँपे रिक्षाचा अपघात एक विद्यार्थीनी ठार तर एक गंभीर जखमी …

Leave a Reply

Your email address will not be published.