Breaking News

घरफोडी प्रकरणात १७ लाखाच्या मुद्देमालासह छावणी पोलिसांनी आरोपी केला जेरबंद

घरफोडी प्रकरणात १७ लाखाच्या मुद्देमालासह छावणी पोलिसांनी आरोपी केला जेरबंद

छावणी पोलीस ठाण्याच्या पथकाने केली कारवाई

शिवशक्ती टाइम्स न्यूज –
उपसंपादक – आनंद दाभाडे
मालेगाव शहरातील कॅम्प रोडवरील १२ बंगला येथे नवजीवन हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरील घरातून १७ लाख ५ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेणाऱ्या आरोपीला पकडण्यात छावणी पोलिसांना यश आले आहे. आरोपी हा फिर्यादीचा जुना वाहन चालक असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. सदर कारवाई पोलीस अधिक्षक सचिन पाटील, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिपकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली छावणी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संजय गायकवाड व त्यांच्या पथकाने केली.
डॉ. दिलीप भामरे हे दि. ३० नोव्हेंबर ते दि. ६ डिसेंबर या कालावधीत कुटूंबासह गोवा येथे गेले होते. या दरम्यान अज्ञात आरोपीने त्यांचे कॅम्प रोडवरील १२ बंगला येथील नवजीवन हॉस्पीटलच्या तिसऱ्या मजल्यावरील घरातून हिरे, प्लॅटीनम, सोन्याचे दागिने असा एकूण १७ लाख ५ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला होता. या चोरी प्रकरणी डॉ. भामरे यांनी छावणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलीस निरीक्षक गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक एस. एस. आहिरे व पथकातील पोलीस नाईक मोठाभाऊ जाधव, पोलिस शिपाई नितीन बाराहाते, संजय पाटील, वासुदेव नेरपगार, विजय घोडेस्वार, कैलास सोनवणे हे तपास करीत असताना त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी तपासात मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज मधील गुन्हयात वापरलेली मोटर सायकल व मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीसांनी आरोपी वाल्मीक कैलास पाटील (रा. द्याने ता. मालेगाव) यास शिताफीने ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेवून सखोल चौकशी केली असता सदरचा गुन्हा हा आपण केला असल्याची कबुली त्याने दिली. तसेच यापूर्वीही डॉ. भामरे यांच्या निवास्थानातुन एक हिऱ्याचा व एक मोत्याचा नेकलेस चोरी केल्याची कबुली दिली. सदरची घरफोडी बनावट चाव्या बनवुन केली असल्याचे देखील त्याने कबूल केले असून त्याच्याकडून चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

About Shivshakti Times

Check Also

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार शिवशक्ती टाइम्स न्युज – (प्रतिनिधी युसूफ पठाण) यापुढे वाहतूक …

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन शिवशक्ती …

दोन तरुणींचा दुचाकी-अँपे रिक्षाचा अपघात- एक विद्यार्थीनी ठार तर एक गंभीर जखमी

मालेगांवतील कॉलेजस्टॉप येथे दोन तरुणींचा दुचाकी-अँपे रिक्षाचा अपघात एक विद्यार्थीनी ठार तर एक गंभीर जखमी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *