Breaking News

बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्षा यांच्या हत्येचा बजरंग दल, मालेगांव कडून निषेध

बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्षा यांच्या हत्येचा बजरंग दल, मालेगांव कडून निषेध

शिवशक्ती टाइम्स न्युज

मालेगाव –  बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्षा यांच्या हत्येचा निषेधार्थ विश्व हिंदु परीषद व बजरंग दल मालेगांव जिल्हाच्या वतीने गृहमंत्री, भारत सरकार यांना अप्पर जिल्हाधिकारी सो, मालेगांव यांच्या तर्फे निवेदन देण्यात आले.

निवेदनाचा आशय असा कि, कर्नाटक राज्यातील शिवमोग्गा जिल्हयातील बजरंग दलाचा कार्यकर्ता राष्ट्रभक्त श्री हर्षा हया युवकाने हिजाब विरोधी पोस्ट करत कनार्टकात समान गणवेशासाठी भगव्या शालेचे मोठे आंदोलन उभे केले होते. त्यात हजारो युवकांनी भाग घेतला होता, आणि त्यामुळे भरस्त्यात क्रूरपणे जिहादी शक्तींकडुन हर्षाची हत्या करण्यात आली. या हत्येचा विश्व हिंदु परीषद व बजरंग दल मालेगांव जिल्हा निषेध करीत आहे.

तसेच निवेदनाव्दारे मागणी करण्यात आली की, सदर घटनेचा तपास राष्ट्रीय अन्वेनषन अभिकरण (एनआयए) यांचेकडे वर्ग करण्यात यावा. व हर्षाच्या हत्येत सहभागी असलेल्या आसिफ, सैय्यद नजिम, रेहान शरीफ, निहान, अब्दुल अफनान, काशिफ यांचे विरुध्द जलदगती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. तसेच हर्षा यांचे हत्येमागे हात असलेल्या सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या कट्टरपंथीय संघटनांवर बंदी घालण्यात यावी.

यावेळी मछिद्र शिर्के, प्रदीपआबा बछाव, शैलेश भावसार, यशवंत ख़ैरणार, साहेबराव वाघ, गणेश जंगम, इंद्रायणीताई मोरे, बंटी तिवारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About Shivshakti Times

Check Also

श्री सप्तशृंगी मातेचे मंदिर संपूर्ण जिर्णोद्धारासह तर गर्भगृह चांदीच्या नव्या नक्षकांत रूपाने झळकणार…!

श्री सप्तशृंगी मातेचे मंदिर संपूर्ण जिर्णोद्धारासह तर गर्भगृह चांदीच्या नव्या नक्षकांत रूपाने झळकणार…! भाविकांनी सढळ …

महाराष्ट्रातील 72 न्यूज पोर्टलच्या स्वनियमन संस्थेला केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याकडून मान्यता

महाराष्ट्रातील 72 न्यूज पोर्टलच्या स्वनियमन संस्थेला केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याकडून मान्यता (संपादक – जयेश …

मालेगावी श्रीराम नवमी शोभायात्रा मिरवणुक जल्लोशात संपन्न

मालेगावी श्रीराम नवमी शोभायात्रा मिरवणुक जल्लोशात संपन्न शिवशक्ती टाइम्स काल दि. 10 एप्रिल रोजी चैत्र …

Leave a Reply

Your email address will not be published.