Breaking News

मालेगांव शहरात मनपाचे तसेच खाजगी वाहनांवर नमूद ‘ महाराष्ट्र शासन ‘नावाबाबत.

मालेगांव शहरात मनपाचे तसेच खाजगी वाहनांवर नमूद ‘ महाराष्ट्र शासन ‘ नावाचा गैरवापर बाबत निवेदन

(संपादक – जयेश सोनार * उपसंपादक – आनंद दाभाडे)  शिवशक्ती टाइम्स न्यूज

मालेगाव : महानगरपालिकेचे लोक प्रतिनिधींचे वाहनांवर ‘ महाराष्ट्र शासन ‘ अशा नावाचा उल्लेख केलेला आहे . याबाबत खाजगी , शासकीय व निमशासकीय वाहनांवरदेखील ‘ महाराष्ट्र शासन ‘ लोगो व नाव नमूद करणेत आलेले आहे . तसेच काही वाहनांवर ‘ प्रेस ‘ व ‘ पोलिस ‘ अशी नावे नमूद असलेने सदरचे नावाचा गैरफायदा होत असलेने सदर नावांचा गैरफायदा घेऊन टोल नाक्यावर वेळोवेळी भांडणे होत असतात .

त्यामुळे सदरचे वाहनांवर शासनामार्फत कोणत्याही प्रकारच्या मार्गदर्शक सूचना नसतानादेखील सर्रासपणे वरीलप्रमाणे वाहनांवर नावे टाकून जसे काही ते सरकारी वाहने आहेत असे भासविले जाते . सदर सर्व वाहनांचा शोध घेऊन व ते बेकायदेशीर असल्यास सदर वाहनांवर आपले कार्यालयामार्फत कार्यवाही करणेत यावी . तसेच आपण केलेले कार्यवाहीबाबत अवगत करावे ही विनंती . आपला विश्वासू.

 

या आशेयाचे निवेदन अपर पोलिस अधिक्षक यांना सार्वजनिक नागरी सुविधा समिती रामदास खंडू बोरसे यांच्या कडून देण्यात आले.

( याविषयीचा माहिती अधिकार सार्वजनिक नागरी सुविधा समिती रामदास खंडू बोरसे यांच्या कडून मा.आर टी ओ  मालेगांव यांना देण्यात आला आहे)

About Shivshakti Times

Check Also

श्री सप्तशृंगी मातेचे मंदिर संपूर्ण जिर्णोद्धारासह तर गर्भगृह चांदीच्या नव्या नक्षकांत रूपाने झळकणार…!

श्री सप्तशृंगी मातेचे मंदिर संपूर्ण जिर्णोद्धारासह तर गर्भगृह चांदीच्या नव्या नक्षकांत रूपाने झळकणार…! भाविकांनी सढळ …

महाराष्ट्रातील 72 न्यूज पोर्टलच्या स्वनियमन संस्थेला केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याकडून मान्यता

महाराष्ट्रातील 72 न्यूज पोर्टलच्या स्वनियमन संस्थेला केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याकडून मान्यता (संपादक – जयेश …

मालेगावी श्रीराम नवमी शोभायात्रा मिरवणुक जल्लोशात संपन्न

मालेगावी श्रीराम नवमी शोभायात्रा मिरवणुक जल्लोशात संपन्न शिवशक्ती टाइम्स काल दि. 10 एप्रिल रोजी चैत्र …

Leave a Reply

Your email address will not be published.