मालेगावी श्रीराम नवमी शोभायात्रा मिरवणुक जल्लोशात संपन्न
शिवशक्ती टाइम्स
काल दि. 10 एप्रिल रोजी चैत्र शुध्द नवमी असल्याने मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीरामचंद्र यांचा जन्म उत्सव शोभायात्रा व पारंपारिक मिरवणुक काढुन विश्व हिंदू परिषेदेच्या वतीने साजरा करण्यात आला. यावेळी मारवाडी गल्ली, मालेगाव कॅम्प श्रीराम मंदीरापासुन मिरवणुकीचा शुभारंभ करुन मोची कॉर्नर, एकात्मता चौक, मोसमपुल मार्गे श्रीराम मंदीर, रामसेतु पुल पर्यंत डफ, ढोल, ताशा, टिंमकी, हलकडी, झांज यांच्यासह धर्मध्वज अग्रस्थानी ठेवून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली.
शोभायात्रेच्या शुभारंभा प्रसंगी डॉ.सुभाष भामरे व दादाजी भुसे यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करत वैदिक मंत्रोच्चार करण्यात आले. यावेळी मालेगाव शहरातील वेगवेगळ्या समाज घटकांचे प्रमुख देखील उपस्थित होते. तसेच भाजप, शिवसेना, क्राग्रेंस, राष्ट्रवादी, मनसे यासह सर्व राजकीय पक्षाच्या पदधिकाऱ्यांनी हजेरी लावली. मिरवणुकीच्या अग्रस्थानी राजमुद्रा प्रतिष्ठानने तयार केलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचा देखावा ठेवण्यात आला होता. अयोध्यामध्ये तयार होत असलेल्या श्रीराम मंदीराची प्रतिकृती हे मिरवणुकीचे विशेष आकर्षक होते. तसेच या वेळी हॅशटॅग ड्रान्स स्टुडीओ यांच्या कलाकारांनी हनुमान चालीसेवर सादर केलेल्या नृत्यांने उपस्थितींचे लक्ष वेधुन घेतले होते. यावेळी श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रेला तरुणांबरोबर महिलांची देखील मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
विद्युत रोशनाई केलेल्या आर्कषक झुंबरान समोर अश्वारुड रथावर प्रभु श्रीरामचंद्राची प्रतिमा व रामदरबाराचा जिवंत देखावा सादर करण्यात आला होता. यामध्ये नेविलकुमार तिवारी यांनी राम, प्रेरणा तिवारी यांनी सिता, राज परदेशी व आकाश शेलार यांनी हनुमानाची भुमिका साकारली होती. मिरवुणकीचे जागोजागी स्वागत करत सामजिक संस्थाकडुन राम भक्तांसाठी शितपेय व नाष्टाची व्यवस्था करण्यात आली होती.
नुकतेच कोरोना निर्बंध हटविल्यानंतर व लॉकडाऊन पासुन धार्मिक उत्सव • परंपरामध्ये खंड पडल्यामुळे राम भक्तांनी अभुतपुर्व संख्येने उपस्थिती लावुन मिरवणुकीची शोभा वाढविली. मिरवणुकीला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेता अनेकांनी रेकॉर्ड ब्रेक गर्दी म्हणुन जमावाचे कौतुक केले. श्रीराम मंदीर, रामसेतु पुल या ठिकाणी मिरवणुकीची सांगता करतांना विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा सहमंत्री मच्छिंद्र शिरके यांनी प्रशासन व राम भक्तांचे आभार मानले.
सागर दत्तु जाधव
मो. 86573700