Breaking News

श्री सप्तशृंगी मातेचे मंदिर संपूर्ण जिर्णोद्धारासह तर गर्भगृह चांदीच्या नव्या नक्षकांत रूपाने झळकणार…!

श्री सप्तशृंगी मातेचे मंदिर संपूर्ण जिर्णोद्धारासह तर गर्भगृह चांदीच्या नव्या नक्षकांत रूपाने झळकणार…!

भाविकांनी सढळ हाताने आपल्या ईच्छेनुसार निधी व देणगी द्यावी-

शिवशक्ती टाइम्स न्यूज

आद्य स्वयंभू शक्तीपीठ अर्थात श्री सप्तशृंगी मातेच्या भाविकांच्या सेवा सुविधेत तत्परतेने कार्यरत असलेली श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट, सप्तशृंगगड ही विश्वस्त संस्था धार्मिक उद्देशा बरोबरच भाविकांच्या विविधांगी सेवा सुविधेत कार्यरत आहे.

विश्वस्त संस्थेमार्फत आलेल्या भाविकांच्या श्री भगवती दर्शन व्यवस्थे बरोबरीने ना नफा ना तोटा प्रकारात भक्तनिवास, महाप्रसाद सुविधा तसेच मोफत आरोग्य व रुग्णवाहिका सेवा, भाविकांसाठी पाणपोई, स्वच्छता आणि सुरक्षा व्यवस्थेसह राज्य व केंद्र शासनाच्या वेळोवेळो होणाऱ्या आवाहनाला साद म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत योगदान देत तसेच कोरोना – १९ सारख्या जागतिक महामारीत देखील विश्वस्त संस्थेने आपली सामाजिक जबाबदारी सार्थपणे पेलवली आहे.

कोरोना संसर्गजन्य परिस्थितीत आपल्या धार्मिक उद्देशासह सामाजिक जाणिवेतून प्रेरित होवून विश्वस्त संस्था कार्यरत असतांना देणगीदार भाविक तसेच मागील अनेक वर्षापासून श्री भगवती चरणी लिन होणारा भाविक वर्ग संस्थेच्या विश्वस्त मंडळ तसेच कार्यालयीन व्यवस्थापनांस कोविड – १९ संकटात विश्वस्त संस्था देत असलेल्या योगदाना बद्दल कौतुकाची थाप देत भविष्यकाळाचा विचार करून विश्वस्त संस्थेने श्री भगवती मंदिर जिर्णोद्धार व मंदिरात अधिक सुबक नक्षिकांत सजावट करावी. अशी अपेक्षा व्यक्त करतं होती. भाविकांची अपेक्षा हिच विश्वस्त संस्थेसाठी प्रेरणा असे गृहीत धरून श्री भगवती मंदिराच्या जिर्णोद्धार व नूतन चांदीच्या नाक्षिकांत कामाचा संकल्प केला आहे.

श्री भगवती मंदिर जिर्णोद्धार प्रक्रियेसाठी भारतीय पुरातत्व विभाग, औरंगाबाद / मुंबई व आय आय टी, (पवई) मुंबई येथील तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घेवून श्री भगवती मंदिर व मंदिर परिसराचे तांत्रिकदृष्ट्या परीक्षणे करून प्राप्त झालेल्या अहवालानुसार गर्भगृह येथील पाणी गळती थांबविणेकामी तसेच गाभारा आकार मोठा करणे हेतूने प्राप्त झालेल्या अहवालानुसार मंदिरातील जुने नक्षिकांत चांदीचे पत्रे काढून तेथील गळती थांबविणेकामी मंदिर परिसरातील पर्वताला (डोंगराला) ड्रिलिंग व ग्राऊंटिंग प्रक्रियेची पूर्तता करून श्री भगवती मंदिरातील पाणी गळतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून अद्याप संभाव्य आवश्यकतेनुसार मंदिरातील देखभाल – दुरुस्ती व डागडुजीचे कामकाज सुरू आहे. नक्षिकांत चांदीचे कामकाज मे पी एन गाडगीळ, पुणे यांच्या मार्फत संपूर्णतः निशुल्क व सेवा प्रकारात नियोजित असून श्री भगवती मंदिरातील चांदीच्या संपूर्ण सजावटीसाठी नाविन्यपूर्ण डिझाईनद्वारे त्यामार्फत पूर्तता केली जाणार आहे.

सद्यस्थितीत श्री भगवतीच्या गर्भगृहातील जुने चांदी धातूचे नक्षिकांत पत्रे काढण्यात आले असून पाणी गळतीसह नूतन चांदी धातूच्या डिझाईनच्या दृष्टीने विविध प्रकारची देखभाल व दुरुस्ती संदर्भीय पूर्तता सुरू असून नक्षिकांत पत्र्यांची डिझाईन तसेच निर्मितीचे काम सातत्यपूर्वक सुरू आहे. सदर नक्षिकांत कामासाठी मोठ्या प्रमाणात चांदी धातुची आवश्यक असून विश्वस्त संस्थेकडे यापूर्वी भाविकांनी अर्पण केलेला चांदी धातू, जुने नक्षिकांत डिझाईनचे पत्रे तसेच नव्याने भाविकां मार्फत संभाव्य प्रकारात अर्पण होणाऱ्या चांदी धातूच्या माध्यमातून सदरचे कामकाज निर्धारित करण्यात आहे. तसेच श्री भगवती मंदिराच्या जिर्णोद्धार व त्याअनुषंगिक तांत्रिक पूर्ततेसाठी किमान ४.५ ते ५ कोटी इतका खर्च अपेक्षित असून सदर दोन्ही उपक्रमासाठी भाविकांनी सढळ हाताने आपल्या ईच्छेनुसार निधी व देणगी द्यावी. असे आवाहन विश्वस्त संस्थेच्या वतीने भाविकांना केले आहे.

भाविकांना वरील दोन्ही प्रकल्पात आर्थिक योगदान द्यायचे असेल तर ते खालील विविध पर्याय वापरून आपली श्री भगवती चरणी देणगी / निधींद्वारे सेवा देवू शकतात.

श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट यांच्या अँक्सीस बँक, दिंडोरी शाखा, जिल्हा. नाशिक या बँक बचत खाते क्र. 4710 1010 0013 989 (आय एफ एस सो कोड UTIB0000471 वरती एन.ई.एफ.टी / आर.टी. जी.एस. प्रकारात तसेच 9422 1011 18 किंवा प्रत्यक्ष विश्वत संस्थेच्या कार्यालयात रोख, धनादेश, धनाकर्ष किंवा क्यू आर कोड द्वारे निधी व देणगी जमा करू शकतात. अशी माहिती ट्रस्ट मार्फत देण्यात आली आहे.

 

शिवशक्ती टाइम्स न्यूज

About Shivshakti Times

Check Also

महाराष्ट्रातील 72 न्यूज पोर्टलच्या स्वनियमन संस्थेला केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याकडून मान्यता

महाराष्ट्रातील 72 न्यूज पोर्टलच्या स्वनियमन संस्थेला केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याकडून मान्यता (संपादक – जयेश …

मालेगावी श्रीराम नवमी शोभायात्रा मिरवणुक जल्लोशात संपन्न

मालेगावी श्रीराम नवमी शोभायात्रा मिरवणुक जल्लोशात संपन्न शिवशक्ती टाइम्स काल दि. 10 एप्रिल रोजी चैत्र …

छत्रपती धर्मवीर संभाजी राजे कॉलनी च्या नामकरण विधी संपन्न

छत्रपती धर्मवीर संभाजी राजे कॉलनी च्या नामकरण विधी संपन्न शिवशक्ती टाइम्स न्युज- मालेगाव –  आज …

Leave a Reply

Your email address will not be published.